Nagpur court bomb threat Pudhari
नागपूर

Nagpur court bomb threat | जिल्हा न्यायालय, पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बस्फोटाची धमकी

तब्बल तीन तास बॉम्बशोधक नाशक पथकाने न्यायालयाचा संपूर्ण परिसर पिंजून काढला

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : सिव्हिल लाइन्समधील जिल्हा न्यायालय व मानकापूर परिसरातील पासपोर्ट कार्यालय बॉम्बस्फोटात उडविण्याच्या धमकीचे ईमेल आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी बॉम्बशोधक,नाशक पथकाच्या मदतीने दोन्ही ठिकाणी कसून तपासणी केली. मात्र कुठलीही बॉम्बसदृश वस्तू आढळून न आल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी जिल्हा न्यायालय व पासपोर्ट कार्यालयाच्या ईमेलवर 'कनीमोझी /द विद्या@हॉट मेल.कॉम' या मेलवरून हा धमकीचा इ मेल आला. या मेलची माहिती मिळताच सदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल देशमुख यांच्यासह बॉम्बशोधक नाशक पथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तीन तास बॉम्बशोधक नाशक पथकाने न्यायालयाचा संपूर्ण परिसर पिंजून काढला. परंतु कोणतीही बॉम्बसदृश वस्तू व व्यक्ती आढळून आली नसल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

याचदरम्यान पासपोर्ट कार्यालयातही बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा मेल प्राप्त झाला त्यामुळे मानकापूर पोलिस तिकडे गेले. संपूर्ण शहानिशा करून परतले. यापूर्वी डिसेंबर 2025 मध्ये उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ बॉम्बने उडविण्याची धमकीचा ईमेल मद्रास टायगर कडून आला होता. दरम्यान, मार्च महिन्यात प्रकाश नामक इसमाने पोलिस नियंत्रण कक्षाला फोनद्वारे उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ उडवून देण्याची धमकी दिली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT