Nagpur Missing Family Case Pudhari
नागपूर

Nagpur Missing Family | 'त्या' बेपत्ता 5 जणांच्या शोधात नागपूर पोलिस पुण्यात

कर्जाचा डोंगर झाल्याने परसवानी कुटुंब नागपुरातून रहस्यमरित्या बेपत्ता

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Paraswani Family Missing

नागपूर : धंतोली पोलिस आता रक्कम काढलेल्या एटीएमच्या सुगाव्यावरून बेपत्ता परसवानी कुटुंबातील पाच जणांचा शोध घेत असून पोलिसांचे पथक पुण्याला रवानाही झाले आहे.

हर्षा सुरेश परसवानी (वय ५७), जितेंद्र सुरेश परसवानी (वय ४२), ईशिता जितेंद्र परसवानी (वय ४०), खुशी जितेंद्र परसवानी (वय २१) आणि कृष्णा जितेंद्र परसवानी (वय १२, सर्व रा. दुर्गा सदन, बलराज मार्ग) अशी या बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत. सोमवारी परसावानी यांच्या एटीएमद्वारे पिंपरी चिंचवड येथील एका एटीएमएमधून पैसे काढण्यात आल्याची माहिती धंतोली पोलिसांना मिळाली.

धंतोली पोलिसांनी लगेच स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. आता या परसवानी कुटुंबातील सदस्यांपैकी कोणी ही रक्कम काढली की, अन्य एखाद्या व्यक्तीने हे काम केले. हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, कर्जाचा डोंगर झाल्याने परसवानी कुटुंब नागपुरातून रहस्यमरित्या बेपत्ता झाले आणि अनेक प्रश्न मागे सोडून गेले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT