Nagpur crime news  
नागपूर

Nagpur crime news | इंस्टाग्रामवरील प्रेम त्रिकोणातून महाल परिसरात गाड्यांची तोडफोड, तिघांना घेतले ताब्यात

काही महिन्यापूर्वी याच परिसरात दोन समुदाय समोरासमोर आल्याने बरेच दिवस तणावाचे वातावरण होते

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : नागपुरातील महाल गांधीगेट परिसरात आज बुधवारी (दि.२५) मध्यरात्रीच्या सुमारास काही सशस्त्र युवकांनी रस्त्यावरील गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली, यामुळे दहशतीचे वातावरण होते. यात कुठेही हिंदू मुस्लिम वाद नाही असे पोलिसांनी स्पष्ट करीत शांततेचे आवाहन केले आहे.

काही महिन्यापूर्वी याच परिसरात दोन समुदाय समोरासमोर आल्याने बरेच दिवस तणावाचे वातावरण होते. इंस्टाग्राम मैत्री यातून फुललेले प्रेमप्रकरण आणि यामध्ये दुसऱ्या युवकाची एन्ट्री अशा काहीशा प्रेमप्रकरणातील गुंतागुंतीमधून नागपूरच्या महाल परिसरात तरुणांच्या टोळक्याने अनेक दुचाकी फोडल्या. दहापेक्षा जास्त गाड्यांची तोडफोड केली. हे युवक हातात धारदार शस्त्र घेऊन रात्री उशिरा धुमाकूळ घालत असताना सीसीटीव्हीत कैद झाले. दोन्ही बाजूने युवक पुढे आल्यानंतर हे युवक पसार झाले.

आपल्या एक्स गर्लफ्रेंडची दुसऱ्या मुलाशी इन्स्टाग्रामवर मैत्री झाली त्यावरून काही तरुणाचा काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. याच रागातून तरुणांच्या एका टोळक्याने काल रात्री गाडीखाना परिसरात राहणाऱ्या मैत्रिणीचा इन्स्टा मित्राच्या परिसरातील (गाडीखाना, जोहरीपुरा) गाड्यांची तोडफोड केली. यावेळी शस्त्र घेऊन परिसरात दहशत पसरवण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान धाडस दाखवित यातील तोडफोड करणाऱ्या टोळक्यातील काही जणांना स्थानिकांनी पकडून पोलिसात स्वाधीन केले. प्राथमिक तपासानंतर तोडफोड करणाऱ्या टोळक्यात 12 युवक असल्याचे समोर आले असून या आरोपींमध्ये अनेक जण अल्पवयीन आहेत. तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गणेशपेठ पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलिस म्हणतात, हे वेगळेच कारण, दोन समुदायात तणाव नाही

या घटनेत कुठेही दोन समुदायातील तणावाची पार्श्वभूमी नसल्याचे पोलिस उपायुक्त राहुल मदने यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. मंगळवारी रात्री साडेअकरा नंतर हातात धारदार शस्त्र घेऊन काही तरुणांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. इन्स्टाग्राम मैत्री ही या वादाची पार्श्वभूमी आहे. प्रेम प्रकरणातून हे प्रकरण घडले. या घटनेनंतर स्थानिकांनी काही जणांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या टोळक्यात १२ जणांचा सहभाग उघड झाला असून अनेक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. गणेशपेठ पोलीसांचा पुढील तपास सुरू असून तिघे ताब्यात घेण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT