नागपूर - राज नगर परिसरात पेट्रोल पंप व्यावसायिक बलजींदरसिंग इंद्रजीत सिंग नय्यर यांच्या घरात केवळ 22 मिनिटात सोने,रत्नजडीत दागिने आणि 65. लाखांची रोकड असा सुमारे तीन कोटीचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या धाडसी चोरी प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सीसीटीव्हीत या दोघांच्या हालचाली चित्रित झाल्या होत्या.
हैदराबाद येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आपल्या प्रेयसीसाठी आयफोन घ्यायचा, पर्यटन करायला जायचे यासाठी त्याने ही चोरी केल्याचे तपासात पुढे आले. न्यायालयाने दोघांना कोठडी सुनावली असून आरोपीबाबाबत पोलिस गोपनीयता पाळत असल्याने यात काही अर्थपूर्ण काळेबेरे असल्याची चर्चा जोरात आहे.
या हायटेक घरफोडीचा उलगडा पोलिसांपुढे गेले अनेक दिवस आव्हान होते. नय्यर कुटुंबीयांच्या घरातील दार ,प्रत्येक बेडरूम, कपाट अशी इत्यंभूत माहिती असणाऱ्या निकटवर्तीयानेच ही चोरी केल्या असल्याचा किंवा मोठी टीप देण्यात आला असावी असा पोलिसांचा कयास होता. चार राज्यात चोरट्यांच्या शोधासाठी सात पोलिस पथके मध्य प्रदेश, गुजरात, ओडिसा व हैदराबादकडे गेली. नय्यर कुटुंबीय कामठी येथे मुलाच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात गुंतले असताना चोरट्याने हा डाव साधला. सोने-चांदी, हिरे जडीत दागिने आणि सुमारे 65 लाख रुपये कॅश असा सुमारे तीन कोटींचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.