नागपूर

Nagpur Crime | वाडी हद्दीत 7.19 लाखांचे अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे पकडले

कृषि विभागाच्या गुण नियंत्रण भरारी पथकाची कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - कृषि विभागाच्या गुण नियंत्रण भरारी पथकाने पोलिसांच्या मदतीने वाडी हद्दीत 7.19 लाखांचे अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे पकडले आहे. योगेश डबरासे वय ३७ वर्ष, वाडी, नागपूर आणि समीर काकडे वय ३१ वर्ष वाहनचालक, वाडी, नागपूर हे एमएच 40 एके 1147 या पिकअप व्हॅनने नागपूरच्या वाडी क्षेत्रात बोगस कापूस बियाणे अवैध वाहतूक करीत असतांना पोलीस स्टेशन वाडीचे पथक आणि नागपूर कृषि विभागाच्या गुण नियंत्रण भरारी पथकाने पकडले.

आरोपी कडून विजया, माउली , तिलक, गैलक्सी हायपर, आरकॉट इ. नावाने बोगस एचटीबीटी कापूस बियाणे १६ गोण्या वाहतूक करतांना रंगेहाथ पकडले. या पोत्यामध्ये ७.१९ लाख रकमेचे बनावट कापूस बियाणे ७९८ पाकिटे आढळून आली आणि १.५० लाख किमतीची पिकअप व्हॅन जप्त करण्यात आली.

ही कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, संचालक निविष्ठा व गुण नियंत्रण सुनील बोरकर, विभागीय कृषि सहसंचालक उमेश घाटगे, मुख्य गुण नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे, गुण नियंत्रण निरीक्षक तथा तंत्र अधिकारी चंद्रशेखर कोल्हे, विभागीय गुण नियंत्रण निरीक्षक संदीप पवार, जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषि विकास अधिकारी तथा भरारी पथकाचे पथक प्रमुख व मोहीम अधिकारी समाधान धूळधुळे यांचे मार्गदर्शनाखाली नागपूर तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी रमा बनकर, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक मार्कंड खंडाईत, नागपूर तालुक्याच्या गुण नियंत्रण निरीक्षक रिना डोंगरे, पंचायत समितीच्या गुण नियंत्रण निरीक्षक गीतांजली नांदूरकर यांचे उपस्थितीत वाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अमित बंडगर, पोलीस हवालदार राहुल बोटरे, रोशन फुकट, विनोद कुंभलकर यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT