Nagpur Crime  
नागपूर

Nagpur Crime | पैशाच्या मोहापाही मद्यधुंद व्यक्तीची केली निर्घृण हत्‍या, ‘क्राईम पेट्रोल’ पाहून मृतदेह झुडपात लपवलाः तीन अभियांत्रिकीचे विद्यार्थी अटकेत

7 एप्रिलपर्यंत कोठडी, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या सुचित भोजापुरे यांचा केला खून, त्‍यांच्या कारमधून त्‍यांच्याच मृतदेहाची लावली विल्हेवाट, कार विक्री करुन पैसे मिळवण्याचा होता प्लॅन

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - पैशासाठी कार पळविणे आणि यातून एकाची हत्या या वाडी येथील घटनेप्रकरणी अटकेतील तीन अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना 7 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुचित उपासराव भोजापुरे (वय ४४, रा. बाबा त्रिमूर्ती सोसायटी, वाडी) यांचा दगडाने ठेचून खून केल्यानंतर अभियांत्रिकीच्या या तीन विद्यार्थ्यांनी 'क्राइम पेट्रोल'मधील मालिका पाहून सुचित यांचा नग्नावस्थेतील मृतदेह झुडपात लपविला.

आरोपी आर्यन नरेश शेंडे (वय २२, रा. व्यंकटेश कॉलनी, नंदनवन) याने पोलिसांना ही बाब सांगितली. त्यानेच मित्रांना या कटात सहभागी करून घेतले. हत्याकांडाचा सूत्रधार आर्यनच असल्याचेही तपासात उघड झाले आहे. सुचित हत्याकांड प्रकरणात वाड़ी पोलिसांनी आर्यन, रिशांख तारेश कांबळे (वय २०, रा. शिल्या सोसायटी, बेलतरोडी) व अनूरमेश वाघमारे (वय १९, रा. हिवरीनगर) या तिघांना अटक केली आहे.

गुरुवारी सकाळी सुचित हे वर्धमाननगरमधील उड्डाण पुलावर मद्यधुंद अवस्थेत होते. तिघांनी त्यांना मदतीविषयी विचारणा केली मात्र त्यांना आधी भिवापूरला घेऊन गेले. सायंकाळी ते वाडी येथे आले. घरी कोणी नसल्याने आर्यनने त्यांच्या हत्येचा कट आखला. सुचित यांची कार काही दिवस आपण वापरू व पुढे कार विक्रीतून मिळालेले पैसे समान वाटून घेऊ असे आमिष देत मित्रांना यात सहभागी करून घेतले.

दरम्यान, मृताची ओळख पटू नये यासाठी 'क्राइम पेट्रोल व गुन्हेगारी विश्वाशी संबंधित अन्य मालिका यूट्युबवर बघितल्या. घरी त्यानुसार, सुचित यांचे कपडे काढले. नग्नावस्थेत सुचित यांचा मृतदेह स्मशानघाटाजवळील झुडुपात लपविला. त्यांचे कपडे, दोन मोबाइल व अन्य साहित्य घेऊन कारसह हे तिघेही पसार झाले. पोलिसांनी कार ,कपडे जप्त केल्यावर आर्यन, रिशंख व अनुजला सोबत घेऊन सूचित हत्याकांडाचे प्रात्यक्षिक केले. गुन्हेशाखा पोलिसांनी तिघांना अटक करून वाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणाचा तपास वाडीचे प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन चरडे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT