molestation case 
नागपूर

Nagpur Crime | लग्नाचे आमिष दाखवून संबंध; घटस्फोटानंतर लग्नास नकार, प्रियकर अटकेत!

नंदनवन पोलिसांची कारवाई; पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : लग्नाचे आश्वासन देत एका विवाहित महिलेसोबत दीर्घकाळ प्रेमसंबंध व शारीरिक संबंध ठेवल्यानंतर तिचा घटस्फोट झाल्यावर लग्नास नकार देणाऱ्या तरुणाला नंदनवन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे नातेसंबंधातील विश्वासघाताचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

नागपूर  नंदनवन परिसरातील २८ वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ३४ वर्षीय हर्षद शंकरराव मनोहर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. तक्रारीनुसार, २०२३ मध्ये खासगी कंपनीत काम करत असताना दोघांची ओळख झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि आरोपीने महिलेला लग्नाचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे.

महिलेने आपल्या वैवाहिक जीवनात अडचणी असून घटस्फोट घेण्याचा विचार असल्याचे आरोपीला सांगितले होते. त्यानंतर दोघे काही काळ एकत्र राहत होते. दरम्यान, त्यांच्यात शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले.२०२४ मध्ये महिलेचा घटस्फोट झाल्यानंतर तिने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली. मात्र, आरोपीने वारंवार टाळाटाळ करत अखेर लग्नास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर महिलेने नंदनवन पोलीस ठाण्यात धाव घेतली.तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपीविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT