Nagpur BJP corporator husband attack  Pudhari
नागपूर

Nagpur Crime | नागपूर हादरले: भाजप नगरसेविकेचा पती जीवघेणा हल्ल्यात गंभीर जखमी

गंभीर जखमी नितीन सिमले यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

पुढारी वृत्तसेवा

Nagpur BJP corporator husband attack

नागपूर : भाजप नगरसेविका मानसी सिमले यांच्या पतीवर जीवघेणा हल्ला झाला. ही घटना जुनी शुक्रवारी परिसरात रविवारी (दि.१६) रात्री उशिरा घडली. गंभीर जखमी असलेले नितीन सिमले यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिस आरोपींच्या शोधात आहेत. सशस्त्र हल्ला करून आरोपी फरार होत असताना सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. आरोपी महेश ठाकरे, सोनू पैलवान आणि नितीन सिमले ही आधी जुनी मित्रमंडळी होती. एका हत्याकांडात दोघे आरोपी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पैशाच्या वादातून ही घटना झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT