Murder Case Pudhari
नागपूर

Youth killed nagpur: वाढदिवसाच्या पार्टीत मिटलेला वाद पुन्हा उफाळला; युवकाची हत्या, मित्र गंभीर जखमी

राजवीर आणि राज यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरूच होता

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : मित्राची वाढदिवसाची पार्टी सुरू असताना झालेल्या वादातून युवकाची हत्या करण्यात आली, तर त्याचा मित्र जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि.१२ ऑगस्ट) मध्यरात्री जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुशीनगर परिसरात घडली. राजवीर सोहनकुमार शर्मा (वय १८ वर्षे, रा. कुशीनगर) असे मृतकाचे नाव आहे. तर, त्याचा मित्र नयन सोनबरसे (वय १९) हा जखमी झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी राज इलमकर (वय २५), त्याचा भाऊ रोहित इलमकर (वय २०), हनी डोंगरे (वय २५) व त्यांच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल कला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजवीर आणि राज यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. दोघांनी जीवे मारण्याची धमकीही दिली होती. गुरुवारी (दि.१३) राजचा वाढदिवस असल्याने बुधवारी रात्री त्याने पार्टी आयोजित केली होती. त्याचे मित्र रस्त्यावर केक कापत असताना राजवीर व त्याचा मित्र तेथून जात होते. यावेळी राजवीर आणि राज यांच्यात वाद झाला. मात्र, काही वेळात हा वाद मिटला.

मध्यरात्री दीडच्या सुमारास राजवीर आणि नयन पुन्हा पार्टीच्या ठिकाणी आले. काही वेळातच इलमकर बंधू त्यांच्या साथीदारांसह तेथे पोहोचले. त्यांनी राजवीर आणि नयनवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात राजवीरचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT