Ranjit Deshmukh Pudhari
नागपूर

Ranjit Deshmukh Warrant | धनादेश न वटल्याने रणजित देशमुख यांच्यासह तिघांविरुद्ध अटक वॉरंट

Cheque Bounce Case | न्यायालयाच्या आदेशांचे पालन न केल्यास आरोपीविरुद्ध पुढील कठोर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Nagpur Court on Ranjit Deshmukh Arrest Warrant

नागपूर : दिलेला धनादेश न वटणे आणि न्यायालयात सातत्याने गैरहजर राहिल्याने संयुक्त दिवाणी न्यायाधीशांनी राज्याचे माजी मंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांच्यासह तिघांविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट (एनबीडब्ल्यू) जारी करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ मार्चरोजी निश्चित करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशांचे पालन न केल्यास आरोपीविरुद्ध पुढील कठोर कारवाई होऊ शकते. तत्पूर्वी आरोपींनी न्यायालयात हजेरी लावून अथवा वकिलामार्फत हजेरी लावून प्रक्रिया सुरू केल्यास दंड भरून हा वॉरंट रद्दही केला जाऊ शकतो.

या प्रकरणातील याचिकाकर्ते अतुल प्रभाकर देवगडे यांनी त्यांचे वकील इब्राहिम बख्श यांच्यामार्फत ही तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, परसेप्ट वेब सोल्युशन प्रा.लि.च्या संचालकांनी संगणक, इंटरनेट व वेब संदर्भातील साहित्य खरेदी केले. देशमुख, पल्लवी पारेख आणि अमित धुपे है या कंपनीचे संचालक आहेत. या खरेदीसाठी कंपनीने देवगडेंना सुमारे ११ लाख ५० हजार रुपयांचे पाच धनादेश दिले.

यातील एकही धनादेश वटला नाही. अनेकदा पाठपुरावा तसेच कायदेशीर नोटीस पाठवूनही उत्तर मिळत नसल्याने देवगडेंनी न्यायालयात धाव घेतली. आरोपी या प्रक्रियेसाठी न्यायालयात हजेरीच लावत नसल्याचे लक्षात आले. अखेर न्यायालयाने आरोपीविरुद्ध रितसर अजामीनपात्र वॉरंट काढला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT