केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी संविधान चौकात एकवटले  Pudhari
नागपूर

Congress Protest Nagpur | इंधन दरवाढीविरोधात संविधान चौकात काँग्रेस रस्त्यावर, बॅरिकेड्स ओलांडताना पोलिसांशी झटापट

केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी संविधान चौकात एकवटले

पुढारी वृत्तसेवा

Congress Fuel Price Protest Nagpur

नागपूर : नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महागाई, बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल दरवाढविरोधात शुक्रवारी (दि.२९) जिल्हाधिकारी कार्यालयावर नारे निदर्शन व जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी बॅरिकेड्स ओलांडून पुढे जाणाऱ्या कार्यकर्त्यांना रोखणाऱ्या पोलिसांशी झटापट झाल्याने वातावरण तापले.

कधीकाळी भाजपने याच मुद्द्यावर केलेल्या आंदोलनाचे स्मरण करून देण्यात आले. जनतेच्या मूळ प्रश्नावरून लक्ष विचलित करण्याचा, आंदोलन पोलिसांकडून दडपण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला. राज्य व केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

केंद्र सरकारने मागील आठवड्याभराच्या कालावधीत पेट्रोल,डिझेल, इंधन किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसत आहे, शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल टंचाई मुळे शेतीच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. या केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी संविधान चौक येथे एकत्रित आले. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय,सिव्हिल लाईन्स येथे पायदळ धडक दिली. यावेळी अनेक आजी,माजी नगरसेवक,पदाधिकारी,

फ्रंटल प्रमुख, महिला काँग्रेस,सेवादल,युवक काँग्रेस, एनएसयूआय पदाधिकारी सहभागी झाले. भर उन्हात झालेल्या या आंदोलनात माजी अध्यक्ष विकास ठाकरे वगळता इतर गट एकत्रित होते. पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेत नंतर सोडून दिले. महागाई संदर्भात निवेदन देताना खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार, डॉ. नितीन राऊत, माजी आमदार अशोक धवड, संदेश सिंगलकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT