काँग्रेसमध्ये बदलाचे वारे, जिल्हा ग्रामीणची आर्थिक सूत्रे कुणाकडे?  File Photo
नागपूर

काँग्रेसमध्ये बदलाचे वारे, जिल्हा ग्रामीणची आर्थिक सूत्रे कुणाकडे?

Nagpur Congress News | गटबाजीने काँग्रेसचे पाय घसरले

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : ग्रामीण काँग्रेसमधील गटबाजी दारुण पराभवानंतरदेखील संपण्याची चिन्हे नाहीत. जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष राजेंद्र मुळक यांना त्यांनी विधानसभा निवडणुकीत अधिकृत उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्यानंतर पक्षाने निलंबित केले. कार्यकारी अध्यक्ष बाबा आष्टणकर यांच्याकडे अध्यक्ष पदाचा पदभार दिला. मात्र सहा महिने उलटूनदेखील नव्या अध्यक्षांकडे पक्षाच्या बँकेचे पासबुक आणि गाडी मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे.

नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी महाविकास आघाडीत उबाठा उमेदवार विशाल बरबटे यांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली. पक्षाने त्यांना शेवटपर्यंत उमेदवारी मागे घेण्यास सांगितले. अखेर, पदमुक्त करीत निलंबित केले. निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. पक्षादेशानुसार बाबा आष्टणकर हे प्रभारी अध्यक्ष झाले.

मात्र, यानंतरही विविध कार्यक्रमात राजेंद्र मुळक यांचा सहभाग कायम आहे. पक्षाने त्यांना निलंबित केले असताना, माजी मंत्री सुनील केदार यांच्या पाठबळावर त्यांचा कारभार सुरू असल्याचे बोलले जाते. मुळक यांच्या बंडखोरीला माजी मंत्री सुनील केदार यांचेच समर्थन होते. माजी मंत्री सुनील केदार व खासदार श्याम कुमार बर्वे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राजेंद्र मुळक हजर होते. यामुळेच पक्षाने नवा अध्यक्ष नेमला असला तरी जुन्याच अध्यक्षांकडे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची आर्थिक सूत्रे असल्याची माहिती पुढे आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT