Nagpur Butibori tank collapse three dead
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात निर्माणधीन बांधकाम सुरू असताना आवाडा कंपनीत शुक्रवारी (दि.१९) दुपारी साडेबारा, एकच्या सुमारास पाण्याची मोठी टाकी अचानक फुटली. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, तर दोन कामगार गंभीर जखमी झाले.
अशोक पटेल, अरविंद कंचन पटेल, अरविंद मोहल ठाकूर अशी मृतांची नावे आहेत. चार जण जखमी झाले आहेत.
अनेकांच्या मते ही टाकी अचानक कोसळली. तर काहींच्या मते स्फोटसारखा आवाज होत ती फुटली. अचानक घडलेल्या घटनेत कुणालाही सुचत नव्हते. परिसरातील कामगार मदतीला धावले. एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला असून जखमींना तातडीने बुटीबोरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तीन कामगारांची प्रकृती गंभीर असल्याने आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता सर्व जखमींना एम्स रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
अवाडा कंपनी बूटीबोरी दुर्घटनेतील एकंदर 8 कामगार जखमी असून त्यापैकी 3 गंभीर आहेत. बुटीबोरी येथील खासगी हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर आता हाती आलेल्या माहितीनुसार ६ जणांचा मृत्यू, तर दोन कामगार गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.