नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील अमरावती रोडवरील वाडी राजीव नगर परिसरात आज (दि. २३) दुपारी एक वायरिंग जोडलेली बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने खळबळ माजली. विधानसभा निवडणूक समोर असताना एकाच रंगाच्या जोड्याच्या डब्यामध्ये ही बॉम्ब सदृश्य वस्तू होती. नागरिकांना ही बाब लक्षात येतात त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
शहर, ग्रामीण पोलीस पथक यासोबतच बीडीएसची चमू तातडीने घटनास्थळी दाखल झाली. हिंगना राजीव नगर येथून ही बॉम्बसदृश्य वस्तू घेऊन बॉम्ब शोधक नाशक पथक अमरावती मार्गाच्या दिशेने रवाना झाले आहे. अर्थातच ही वस्तू निकामी झाल्यानंतर फॉरेन्सिकच्या माध्यमातून यात नेमके काय घटक आहेत. त्याचा उलगडा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.