Ramesh Mantri Passed Away
नागपूर : भाजप नेते, उद्योगपती आणि नागपूर नागरिक सहकारी बँकेचे.माजी अध्यक्ष रमेश मानकलाल मंत्री यांचे सोमवारी (दि.२९) निधन झाले. मृत्युसमयी ते 73 वर्षांचे होते. विविध सामाजिक संघटनांशी जुळलेले मंत्री गेले काही महिने आजारी होते.
रमेश मंत्री यांनी 1998 ची लोकसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवली होती. ते नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कृत भारती संघटनेशी त्यांचा जवळून संबंध होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनानिमित्त शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.