महापालिकेच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे आणि वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे यांनी भेट देत पाहणी केली  Pudhari
नागपूर

Nagpur Waste Project | भांडेवाडी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पातील कचऱ्याचे ढिगारे कमी होणार

स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे आणि वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे यांनी घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली

पुढारी वृत्तसेवा

Bhandewadi Garbage Piles

नागपूर: भांडेवाडी स्थित मनपाच्या एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पात आता कचऱ्याचे ढिगारे कमी होणार आहेत. सातत्याने आगीच्या घटना कमी होणार आहेत. महापालिकेच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी-वखरे आणि वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे यांनी भेट देत पाहणी केली.

शहरात दररोज १३०० मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे. सध्या सुसबिडीच्या माध्यामातून २५०-३०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असून, भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीद्वारे ५०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. आता नवीन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया केल्यामुळे या ठिकाणी नव्याने कचऱ्याचे ढिग निर्माण होणार नाही, आणि जुन्या कचऱ्यावर सुद्धा प्रक्रिया सुरू आहे.

परिणामी भांडेवाडी परिसरात दिसणारे कचऱ्याचे ढिगारे कमी होऊन जागा मोकळी होण्याची शक्यता आहे.भूमी ग्रीन एनर्जी एन्व्हायरोकेअर एलएलपी कंपनीच्या प्रक्रिया केल्या जाणाऱ्या कचऱ्यातून सेंद्रिय खत निर्मिती व आरडीएफ तयार केले जाणार आहे. यावेळी भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीचे विजय टिळेकर, पंकज पासनकर, श्रीकृष्ण दीक्षित यांनी प्रकल्पाची माहिती दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT