Bhandewadi dumping yard fire Nagpur
नागपूर : भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरात शनिवारी (दि.३१) पुन्हा एकदा आग लागली. सात अग्निशमन गाड्यांनी धाव घेत सायंकाळी ती नियंत्रणात आली. आज दुपारी ३.२३ वाजताच्या सुमारास ही भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळाल्यावर मनपाच्या विविध अग्निशमन केंद्रातून फायर टेंडरसह अग्निशमन पथकाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली.
मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्यासह अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बारहाते यांनी घटनास्थळी भेट दिली.
यावेळी पाण्याचे फवारे मारून आग नियंत्रणात आणली गेली. आग पुन्हा पेटू नये याकरिता कुलिंग ऑपरेशन करण्यात आले. भांडेवाडी येथील आगीत कोणतीही आर्थिक नुकसान तथा जीवित हानी, दुखापत झाली नसून परिस्थिती पूर्ण पणे नियंत्रणात आहे. आग विझविण्यात अग्निशमन विभागाच्या ७ फायर टेंडर घटना स्थळी होते. मुख्य अग्निशमन अधिकारी तुषार बारहाते यांच्या मार्गदर्शनात ही आग नियंत्रणात आणली गेली.