Nagpur Youth Attack
नागपूर : आपल्या गर्लफ्रेंडने आपल्याला सोडून दुसऱ्या तरुणासोबत बोलणे सुरू केल्याचा राग मनात ठेवून एका प्रियकराने साथीदाराच्या मदतीने चाकू हल्ला करून सदर तरुणाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नंदनवन पोलीस स्टेशन, कॉलेज रोडवर घडली.
पोलिसांनी या प्रकरणी चौघांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे. नव्ही (वय 21) असे जखमी तरुणाचे नाव आहे. संकेत वंजारी (वय 24, रा. नंदनवन, वैभव अशोक तानेलवार व त्याचे दोन साथीदार अशी आरोपींची नावे आहेत.