लाच प्रकरण  file photo
नागपूर

नागपूर : सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारीसह दोघे जाळ्यात

अवघ्‍या ४०० रुपयांच्या लाचेचा मोह भोवला

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - तीन वाहनांच्या हस्तांतरण प्रक्रियेसाठी 400 रुपयाची लाच घेताना नागपूर ग्रामीणचे सहाय्यक परिवहन अधिकारी व त्यांचा एक सहकारी अशा दोघांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

दोघांना ताब्यात घेतल्यानंतर कपिल नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. अशफाक मेहमूद अहमद वय 57 वर्ष, पद - सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्ग 1 आणि मिर्झा असराग अकरम बेग, वय ३० वर्ष, व्यवसाय- खाजगी रा.सतरंजी पुरा छोटी मस्जिद जवळ ,नागपूर अशी आरोपींची नावे आहेत. भालदारपुरा येथील 44 वर्षीय तक्रारदार यांची बहिण यांचे नावाने दुचाकी वाहन तसेच तक्रारदार यांचे परिचयाचे दोन व्यक्ती यांचे नावावर एक दुचाकी व एक चारचाकी वाहन असे एकूण तीन वाहनाचे हस्तांतरनात (ट्रान्स्फर ऑफ ओनरशिप)कोणतीही त्रुटी न काढता लवकर काम करून देण्याकरीता आरोपीनी ही लाच मागितली होती. दिगंबर प्रधान, पोलीस अधीक्षक,. नागपूर परिक्षेत्र,संजय पुरंदरे सर, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनात श्रीमती उज्वला मडावी, पोलिस निरीक्षक, प्रवीण लाकडे, पोलिस निरीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT