संविधानातील पृष्ठांवर जाहिरातीमुळे आंबेडकरी अनुयायी संतप्त 
नागपूर

Nagpur News : संविधानाच्या पानांवर जाहिरात; आंबेडकरी अनुयायी संतप्त

भदंत ससाई यांनी दिशाभूमीतील दोन दुकानदारांना दाखविला बाहेरचा रस्ता

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : भारतीय संविधानातील आतील पृष्ठांवर जाहिरात प्रकाशित करून त्या प्रतींची विक्री करणाऱ्या दोन्ही दुकानदारांना डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्म सेना नायक भदंत आर्य नागार्जुन सूरेई ससाई यांनी दीक्षाभूमी परिसरातून बाहेर केले. स्मारक समितीचे अध्यक्षांनी आंबेडकरी अनुयायांच्या संतप्त भावना लक्षात घेता या संवेदनशील प्रकरणाची गंभीर दखल घेतली.

प्रारंभी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. संविधानाच्या प्रति विकणाऱ्या दोघांनाही दीक्षाभूमी परिसरातून बाहेर केले. यावेळी काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. संविधान आमचा प्राण आहे, संविधान आमच्या श्वास आहे. संविधानाच्या प्रकाशित प्रतींना कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करीत असल्यास आम्ही कदापि सहन करणार नाही, असा इशारा ससाई यांनी यावेळी दिला.

भीमराज सेनेचे विदर्भ अध्यक्ष रवी नितनवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा गंभीर प्रकार रविवार (दि. ८) उघडकीस आणला तसेच या प्रकरणाची लेखी तक्रार बजाज नगर पोलिस ठाण्यात केली. बजाज नगर ठाण्यातील पोलिसही तात्काळ दीक्षाभूमीत पोहोचले. जाहिराती असलेल्या संविधानाच्या काही प्रती पोलिसांनी ताब्यात घेतल्या. याप्रसंगी भिक्खु संघ, धम्म सेना, भीमराज सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT