नागपूर - धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आंबाझरी तलाव येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल येथील एक टीम नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असताना अंघोळीकरीता तलावात दोन युवक गेले होते. सुर्देश गोरखनाथ (अंदाजे वय 15 ते 16 वर्ष, जिल्हा बिदर, राज्य कर्नाटक) तसेच सिद्धीनाथ गोरखनाथ अंदाजे (वय 20 वर्षे, जिल्हा बिदर, राज्य कर्नाटक) हे दोन युवक बुडत असल्याचे समजले.
लोकांचा बुडाले बुडाले असल्याचा आवाज येताच टीमने बोटीच्या साहाय्याने त्यांच्या जवळ पोहचून पाण्यात उडी मारली आणि दोघांनाही सुरक्षित बाहेर काढले.
सिद्धनाथ गोरखनाथ हा शुद्धीत होता आणि सुर्देश गोरखनात यास बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढले आणि प्रथमोपचार देऊन त्याला शुद्धीत आणले व रुग्णवाहिका येण्यास वेळ लागल्याने त्यांना खासगी वाहनाने इंदिरा गांधी हॉस्पिटल (मेओ) येथे रवाना करण्यात आले.
पोलीस निरीक्षक जी. जी खोब्रागडे, पोलीस उपनिरीक्षक आय डब्ल्यू रंदाई, एस पी बोंदर, एस. बी. मेंढे, लिंबा राठोड, सागर सदाफडे, गजानन पन्नासवार आदींनी यात पुढाकार घेतला.