प्रातिनिधीक छायाचित्र File Photo
नागपूर

उपराजधानी नागपुरात पडली १.३६ लाख नव्या वाहनांची भर!

Nagpur automobile growth| मागील ६ वर्षातील आकडेवारी

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : हल्ली निरोगी जीवनासाठी सायकलिंग आवडीचा प्रकार झाला असला तरी आपली इतरे कामे ही दुचाकी किंवा चारचाकी वाहनानेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या ७० महिन्यांत नागपुरमध्ये तब्बल १.३६ लाखांहून अधिक नव्या वाहनांची खरेदी झाल्याची आकडेवारी प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ)ची आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते (आरटीआय) अभय कोलाकर यांनी ही माहिती मागितली होती. आरटीओतील जन माहिती अधिकारी तथा सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी संतोषकुमार काटकर यांनी कोलारकर यांना दिलेल्या माहितीनुसार शहरात एकूण १ लाख ३६ हजार१८१ वाहनांची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक २६,७३१ इतकी नोंद २०२३ या वर्षात तर सर्वात कमी १६,८०४ इतकी नोंद वर्ष २०१६ मध्ये झाली. याशिवाय कोलारकर यांनी शहरात २०२२ ते २०२४ या काळात किती वाहने नोंदविली आहेत, याची माहिती मागितली. त्याच्या उत्तराला आरटीओकडून कोलारकर यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीनुसार या काळात शहरात एकूण ७८ हजार२६३ वाहनांच्या नोंदी झाल्या. यात मोटरसायकल/स्‍कूटर ५०,२७३, मोटरकार २२,७२६, ई-रिक्षा ५९५, ई-रिक्षा मालवाहक २९२, मोटर कॅब ८८९, थ्री व्हिलर पॅसेंजर ६४३, ट्रॅक्टर१३७ आदी वाहनांचा समावेश आहे.

दिवाळीतील वाहनांची विभागाकडे नोंद नाही!

आरटीआय कार्यकर्ते कोलारकर यांनी आरटीओकडे यंदा वर्ष २०२४ च्या दिवाळी किंवा दस-याच्या मुहूर्तावर दुचाकी, चारचाकी, मालवाहतूक, रिक्षा, बसेस आदी किती वाहनांची नोंदणी झाली. याची माहिती मागितली. मात्र,आकडेवारीने विभागाकडे ही माहिती उपलब्ध आहे किंवा नाही, याबाबत साशंकताच आहे. दरम्यान,१ नोव्हेंबर २०२१ ते 31 ऑक्टोबर २०२४ या तीन वर्षांचा विचार केल्यास नागपुरमध्ये ९,४७६ वर इलेक्ट्रिक वाहनांची नोंद झाली. २०२१ मध्ये १९७२, वर्ष २०२२ मध्ये ३७९६ तर ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ३७०८ वाहनांच्या नोंदी झाल्या.

२०१९ पासून अशी झाली वाहनांची नोंद

वर्ष वाहनांची संख्या

२०१९ २५३५७

२०२० १६८०४

२०२१ १९३०२

२०२२ २४३६७

२०२३ २६७३१

२०२४ २३६२० (ऑक्टोबर पर्यंत)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT