HSC Paper Nagpur News 
नागपूर

HSC paper leak | 12 वी पेपरफूट प्रकरणात ५वा आरोपी अटकेत

राज्य सरकारने यासंदर्भात एसआयटी स्थापन केली असून तपासाला वेग आला आहे

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेतील पेपरफूट प्रकरणात आता पोलिसांनी पाचव्या आरोपीला अटक केली आहे. दिनेश कोटांगले असे या खाजगी शिकवणी संचालकाचे नाव असून लवकरच आणखी एका शाळेतील शिक्षकास अटक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान आतापर्यंत पकडण्यात आलेल्या चार आरोपींच्या मोबाईल सी.डी.आर वरून बारावी परीक्षेचा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र सोबतच गणिताचाही पेपर फुटला होता असे पुढे आले आहे. राज्य सरकारने यासंदर्भात एसआयटी स्थापन केली असून तपासाला वेग आला आहे.

या प्रकरणात बारावीचे विद्यार्थी अडकले असल्याने आणि त्यांची परीक्षा सुरू असल्याने संवेदनशील प्रकारे तपास सुरू आहे. कॉपीमुक्त अभियानावर राज्य सरकारचा भर असल्याने सर्व पाळेमुळे खोदून काढली जाणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूरमधील या पेपरफूट प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक झाली असून, एका विद्यार्थ्याला जामीन मिळाला आहे. एकंदर व्याप्ती बघता, विविध शिकवणी वर्ग संचालकासोबतच अनेक विद्यार्थीही ज्यांची परीक्षा सुरू आहे यात अडकल्याने सावध पद्धतीने हे प्रकरण हाताळले जात आहे.

बोर्डातून निघालेल्या 25 पैकी 24 प्रश्नपत्रिका पोहचत सेंटरवर दरम्यान, या पेपर फुट प्रकरणासंदर्भात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यानुसार 25 प्रश्नपत्रिकांचा संच सेंटरवर पोहोचल्यानंतर यात 24 प्रश्नपत्रिकाच असल्याचे निदर्शनास आले असे विविध ठिकाणी झाल्याने पर्यवेक्षकांनी या संदर्भात नागपूर विभागीय शिक्षण मंडळाकडे तक्रार देखील केली होती. आता नेमक्या या प्रश्नपत्रिका कुठे गहाळ झाल्या, यावरून विद्यार्थ्यांपर्यंत मोबाइलद्वारे मॉडेल उत्तर पत्रिका कशा पोहोचल्या याचादेखील मागोवा घेण्याचे आव्हान पोलिस आणि या विशेष तपास समितीपुढे असणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT