विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात पत्रकारांशी चर्चा केली. 45 words / 358 characters  Pudhari Photo
नागपूर

'मविआ'ची ३८ जागांवर मैत्रीपूर्ण लढत?; विजय वडेट्टीवारांचा मोठा खुलासा

पुढारी वृत्तसेवा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत एकमत होत असून नवरात्रीत तीन दिवस बैठकीतून मविआचे जागावाटप निश्चित होणार असल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. यावेळी त्यांनी ३८ जागांवरील मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता फेटाळून लावली. वडेट्टीवार यांनी आज (दि.२) नागपुरात पत्रकारांशी चर्चा केली.

वडेट्टीवार पुढे म्हणाले की, कोणत्याही मतदार क्षेत्रात मैत्रीपूर्ण लढतीचा विषय नाही. ८, ९ आणि १० ऑक्टोबररोजी महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत मुंबईत बैठक आहे. नवरात्रीत बहुतांश जागांची घोषणा केली जाईल. जागावाटपाच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी खूप पुढे गेली आहे. ३ दिवसांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर उमेदवारांची नावेही जाहीर केली जाणार आहेत. निश्चितच काही जागांवर एकमत नाही. महाविकास आघाडीत तिन्ही प्रमुख पक्षांनी त्या जागांवर उमेदवारीचा दावा केला आहे. मात्र, जागा जिंकण्यासाठी आघाडीच्या बैठकीत एकमत होणार आहे. ३८ जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा विषय कुठून आला, हे मला पण कळले नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT