नागपूर

'अन्यथा तुम्हीही मौलवी असता...', बागेश्वरधामवर मुधोजी राजे भोसले संतापले !

Nagpur News | मराठ्यांचा इतिहास पाठ्यक्रमातून वगळण्याचा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न आम्ही कदापी होऊ देणार नाही

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : उत्तर भारतातून एनसीइआरटीची सुपारी घेतल्यासारख्या आविर्वाभावातुन महाराष्ट्रात येवुन भारताचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणारे, अखंड हिंदुस्तानाचे दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल चुकीचे विधान करणाऱ्या बागेश्वर बाबाच्या वक्तव्याचा राजे मुधोजी भोसले यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

महाराजांनीं 'देव, देश आणि धर्मासाठी आयुष्य वेचले, हे सत्य आहे. मात्र आज मोठे दुर्दैव वाटते की, जे लोक स्वतःला धर्माचे रक्षक म्हणवतात, तेच महाराजांबद्दल वादग्रस्त आणि चुकीची विधानं करत आहेत ही आजची शोकांतिका आहे. मराठ्यांचा इतिहास पाठ्यक्रमातून वगळण्याचा मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न आम्ही कदापी होऊ देणार नाही.

शिवाजी महाराजांच्या पुण्याईमुळे आज तुम्ही बागेश्वर बाबा आहात अन्यथा मौलवी बाबा राहिला आसतात. आजही आम्ही आमच्या मुद्यावर ठाम आहोत. आम्ही कालही, साधु संताचा आदर केला तो आजही व भविष्यातही करू. परंतु वादग्रस्त विधानाचा निषेधचं करू असेही राजे मुधोजी भोसले यांनी ठणकावले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT