Mother murdered over family dispute; Son remanded in custody till June 9
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
कौटुंबिक वादात मुलाने धारदार शस्त्राने वार करून आईचा खून केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेर पोलीस ठाणे अंतर्गत पहिलेपार झोपडपट्टी परिसरात घडली. या प्रकरणी न्यायालयाने त्याची ९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, मुकेश नेहमी आई प्रमिला यांच्यासोबत वाद घालत होता. शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास त्याचे आई प्रमिलासोबत जोरदार भांडण झाले. काही वेळातच त्याने धारदार शस्त्राने आईवर वार केले. त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर मुकेश पसार झाला. सावनेर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पंचनाम्यासाठी. मृतदेह हॉस्पिटलला पाठविला आणि संशयित आरोपीला अटक केली. शनिवारी न्यायालयाने त्याची 9 जून पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. प्रमिला गणपत मरसकोल्हे (वय 49) असे मृतक महिलेचे नाव असून मुकेश गणपत मरसकोल्हे असे संशयित आरोपी मुलाचे नाव आहे.