File Photo
नागपूर

मुलगी दूध पित नसल्याने आईने संपवले जीवन

Nagpur News | नैराश्यातून उचलले टोकाचे पाऊल

पुढारी वृत्तसेवा

नागपूर- सव्वा महिन्याची चिमुकली आपले दूध पित नसल्याने आईने नैराश्यातून आत्महत्या केल्याची घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वश्रीनगर येथे घडली. भाग्यश्री राजेश वानखेडे वय 24 वर्षे असे या मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाग्यश्रीचे पती राजेश कुशनचे काम करतात.

चार वर्षांपूर्वी दोघांचे लग्न झाले. राजश्री नगर येथे सर्वश्रीनगर येथे एका भाड्याच्या घरात हे कुटुंब राहतात. अलीकडे त्यांना मुलगी झाल्याने आनंदाचे वातावरण होते. मात्र, त्याच्या चिमुकलीने अचानक दूध पिणे बंद केल्याने भाग्यश्री चिंतेत होती. पतीने तिला काही दिवस लाखांदूर येथील मोठ्या बहिणीकडे देखील पाठवले मात्र त्याचा फार उपयोग झाला नाही. नुकतीच घरी परत आल्यानंतर तिने विष प्राशन केले. खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले मात्र तिचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT