नागपूर

केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावरच रोष कसा : आमदार खोपडे

दिनेश चोरगे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मनोज जरांगे- पाटील यांचे उपोषण दोन महिने स्थगित झाले आहे. परंतु आता मराठा आंदोलन आणि त्यामागील राजकारणाची उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. मराठा आंदोलकाचा केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावरच रोष कसा ? असा थेट सवाल पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी उपस्थित केला आहे.

याबाबत बोलताना खोपडे म्हणाले, आंदोलन मागे घेण्यात आले ही आनंदाची गोष्ट आहे. सकाळपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा भोंगा सुरू होत असतो आणि रोज फक्त सरकार पडणार आहे, हेच ते बोलत राहतात. मुळात आज दीड वर्ष सरकारला होत असून हे सरकार पडणारच नाही, असा दावा भाजपचे आमदार खोपडे यांनी केला आहे.

आजवर राज्यात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले परंतु आरक्षणाचा मुद्दा कोणीही मार्गी लावला नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात पोहोचला पण तिथे हे टिकवू शकले नाहीत. परंतु मनोज जरांगे- पाटील केवळ फडणवीसांवर टीका आहेत. आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना अभयदान देत आहेत, असा आरोपही कृष्णा खोपडे यांनी केला आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT