Parswani Family Safe in Pimpri Chinchwad
नागपूर: लोकांच्या कर्जाचा कोंडमारा चुकविण्यासाठी रहस्यमरीत्या बेपत्ता झालेले धंतोलीतील दुर्गा सदन येथील 5 सदस्यीय परसवानी कुटुंब अखेर पिंपरी-चिंचवडमध्ये नातेवाईकांकडे सुखरूप आढळल्याने धंतोली पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला.
डेली निड दुकान असताना त्यांच्यावर लाखोंचे कर्ज झाले. कर्ज देणाऱ्यांनी त्यांच्याकडे पैशाचा तगादा लावल्याने हर्षा सुरेश परसवानी, जितेंद्र सुरेश परसवानी, ईशिता जितेंद्र परसवानी, खुशी जितेंद्र परसवानी आणि कृष्णा जितेंद्र परसवानी (सर्व रा. दुर्गा सदन ) ही मंडळी घर सोडून निघून गेली. मोबाइल बंद ठेवला. यादरम्यान पाचही जण बेपत्ता झाल्याचा माहिती समोर आल्याने खळबळ माजली होती