Pyare Khan Pudhari
नागपूर

Illegal Minority Certificate | अजितदादांच्या निधनानंतर चार दिवसांत 75 शिक्षण संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघड

Minority Commission Pyare Khan | अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची कारवाई करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Minority Status Certificate Scam                      

नागपूर: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात राजकीय शोक पाळला जात असताना त्याच दिवशी सहा तर केवळ चार दिवसात 75 शिक्षण संस्थाना अल्पसंख्यांक दर्जा संबंधित मंत्रालयामार्फत दिला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या घोटाळ्याची सीआयडी चौकशी करा, झारीतील शुक्राचार्य, पैशासाठी हपापलेले संधीसाधू अधिकारी आणि दोषींना मकोका लावून त्याची थेट कारागृहात रवानगी करण्याची मागणी राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी केली आहे. एका बड्या नेत्याचे,मंत्र्यांचे निधन झाले असताना हा सर्व प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे सांगत त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले.

28 जानेवारी ज्या दिवशी अजितदादांच्या विमानाला अपघात घडला. त्याच दिवशी दुपारी मंत्रालयातून सात प्रमाणपत्र जारी करण्यात आले. यानंतर सुटीचा दिवस वगळता चार दिवसांत 75 शाळांना अल्पसंख्यांक दर्जा प्रमाणपत्र देण्यात आले. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांची बेबंदशाही चर्चेत आली आहे.

मान्यता मिळालेल्या 75 पैकी 25 शाळा तर पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या आणि सेंट झेव्हियरच्या सहा शाळा, स्वामी देवप्रकाश,शांती प्रकाशच्या चार शाळा आणि यवतमाळ येथील संत सेवादास महाराज शिक्षण संस्थाचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. अल्पसंख्यांक दर्जा मिळाल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत 25 टक्के राखीव जागा तसेच शिक्षकांना टीइटी परीक्षा अनिवार्य नसते यामुळे मोठा आर्थिक लाभ मिळवता येतो. ऑगस्ट महिन्यापासून हे प्रमाणपत्र वाटप रोखून धरलेले असताना एकाच वेळी मोठ्या आर्थिक व्यवहारातून हे प्रमाणपत्र दिले गेल्याचा आरोप केला जात असून सखोल चौकशीची मागणी केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT