मतीमंद मुलांनी नागपूरकर रोहित शर्माला शुभेच्छा दिल्या.  File Photo
नागपूर

मतीमंद मुलांनी दिल्या नागपूरकर रोहित शर्माला शुभेच्छा!

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : उद्या 6 फेब्रुवारी रोजी व्ही.सी.ए. मैदान जामठा येथे होणाऱ्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघास तसेच नागपूर जन्मस्थान असणारे लोकप्रिय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांना नागपूर येथील सहारा मतिमंद मुला-मुलींची विशेष अनिवासी शाळेतील विद्यार्थ्यांनी विजयी होण्याकरिता जल्लोषात शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थाध्यक्ष , माजी नगरसेवक मनोज गावंडे, ब्रदर मनीष चांदेकर संस्था सचिव, शोभा केने शाळाप्रमुख, शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील भारतीय संघास शुभेच्छा दिल्या. यावेळी caption My Hero, भारत का गौरव भारत की आन बान शान ! संतरा नगरीत आपले सहर्ष स्वागत!Indias Hero Nagpurs Pride आदी घोषणा देण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT