मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस pudhari photo
नागपूर

नागपूर : 'मेयो’,‘मेडिकल’च्या कामासाठी वॅार रूम

Mayo Medical War Room: एप्रिल महिन्यात पुन्हा आढावा

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : शहरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील वैद्यकीय सेवा सुविधा वाढाव्यात व अधिकाधिक गरजू रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये निधी येथील कामांना उपलब्ध करून दिला आहे. ही कामे दिलेल्या कालमर्यादेत व आराखड्यानुसार पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले. एप्रिलमध्ये पुन्हा आढावा घेतला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विकास कामाचा आढावा घेतला. काल मर्यादित कामे करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम तयार करण्यात आली आहे.

यावेळी आ. प्रवीण दटके, आ. मोहन मते, आ. आशीष देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, , वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, डॉ. राज गजभिये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) यांना लागणा-या वीजेची गरज ही सौर ऊर्जेच्या माध्यमातूनच भागविली पाहिजे. संपूर्ण कॅम्पस परिसर हा सौर ऊर्जेवर असावा , यावर भर मुख्यमंत्र्यानी भर दिला.

मेडिकल आणि मेयोमधील सध्याची प्रस्तावित कामे पूर्ण करावी त्यानंतरच नवीन कामे सुरू करावीत असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT