आपचा संघ बिल्डिंगवर 'जवाब दो मोर्चा', भागवत यांना ५ प्रश्न File Photo
नागपूर

आपचा संघ बिल्डिंगवर 'जवाब दो मोर्चा', भागवत यांना ५ प्रश्न

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

आम आदमी पार्टी नागपूर शहरतर्फ़े महालस्थित आर एस एस मुख्यालय, संघ बिल्डिंगवर 'जवाब दो मोर्चा' महाराष्ट्र संगठन सचिव भूषण ढाकुलकर व शहराध्यक्ष अजिंक्य कळंबे यांच्या नेतृत्वात धडकला आले. यावेळी 6 लोकांचे शिष्टमंडळ पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून संघ बिल्डिंग येथे नेण्यात आले. आरएसएसचे प्रतिनिधी म्हणून अजय जलताडे यांनी चर्चा केली.

आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्ली राज्याचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी आर एस एस प्रमुख मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारले आहेत. संघ भाजपची मातृतुल्य संस्था आहे. भारतीय संस्कृती अनुसार पालक आपल्या पाल्याला तत्त्वावर चालण्याची शिकवण देतो. भाजपाद्वारे ED आणि CBI चा गैरवापर बरोबर आहे का? इमानदार नेत्यांना डावलून भ्रष्टाचारी लोकांना समोर आणण्याचा मोदींचा कट भागवत यांना मान्य आहे का?, ७० हजार कोटीचा घोटाळा करणारे अजित पवार यांच्यावर आरोप लावणारे पंतप्रधान मोदी यांनी फक्त ५ दिवसात त्यांना भाजपात प्रवेश करून उपुख्यमंत्री केले असे अनेक प्रकार कसे घडले.

या विषयी जवाब मागण्यासाठी आपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने चिटणीस पार्क येथून मोर्चाने धडकले. पोलिसांनी त्यांना बडकस चौकात रोखले. यावेळी प्रामुख्याने राज्यसचिव डॉ शाहिद अली जाफरी, शहर संघटन मंत्री रोशन डोंगरे, सचिन लोनकर व प्रदीप पौनीकर, शहर उपाध्यक्ष संगीता बाहतो व नामदेव कांबडी, शहर महासचिव डॉ. अमेय नारनवरे, ग्रामीण उपाध्यक्ष शैलेश गजभिये, ग्रामीण संघटन मंत्री शौकत अली बागबान यांच्यासह तनुजा वाटकर गुडधे, विपिन कुर्वे, सुषमा कांबळे, अलका पोपटकर, संजय बोरकर, विनोद गौर, पुष्पा डाबरे, मंजू पोपळे, जॉय बांगरकर, गिरीश तितरमारे, प्रणित डोंगरे, किशन निमजे, प्रशांत अहिरराव, प्रज्ञाजीत सोमकुवर, सुनील मॅथ्यू, क्लायमेट डेव्हिड, सुरब दास, तिडके काका, मनोज डोंगरे, तन्मय सरोदे, अंकित ठाकरे, राहुल ठाकरे, सचिन पारधी आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT