Maratha Reservation: Chhatrapati Raje Mudhoji Bhosale Says Marathas Don’t Want OBC Quota
नागपूर - मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको आहे, मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी केली आहे. यामुळे आजवर ‘एक मराठा लाख मराठा’भूमिकेतून एकवटलेल्या मराठा समाजात आता दोन मतप्रवाह असल्याचे उघड झाले आहे.
मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण हवे आहे, त्यासाठी ओबीसीतून आरक्षण देण्याची गरज नाही. मराठा समाजाला वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्यावे, अशी भूमिका मुधोजी राजे भोसले यांनी स्पष्ट केली. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला शुभेच्छा आहेत. मात्र ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही विरोध करतो, असेही मुधोजी राजे भोसले यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात जे काम केले, ते खरंच कौतुकास्पद आहे. आता न्यायालयात टिकेल असेच आरक्षण मराठा समाजाला हवे आहे, आणि त्यावर मराठा समाज ठाम आहे, असे नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी सांगितले.