नागपूर : शहरात एकीकडे श्रीराम नवमीचा उत्साह ओसंडून वाहत असताना दुसरीकडे गोरेवाडा मानकापूर परिसरात झालेल्या अपघाताने शहर हादरले. एक कार आणि अनियंत्रित ट्रक टिप्परच्या भीषण अपघातात ऑटोमोबाईल विश्वातील मोठे प्रस्थ हसन गॅरेजचे मालक झहूरभाई हसन यांचा मृत्यू झाला तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले.
अपघातग्रस्त कारचा क्रमांक एम एच 31 इए 9199 असा तर टिप्परचा क्रमांक एमएच 40 बीजी 8191 असा आहे. गोरेवाडा परिसरातील पलोटी शाळेजवळ दोन्ही वाहने भरधाव असल्याने हा भीषण अपघात घडल्याचे समजते. अपघातानंतर अनेकजण या अपघाताचा व्हिडीओ, फोटो घेण्यात गुंतलेले असताना येथून जाणाऱ्या वायुसेनेचा जवान अनुज यादव यांनी तातडीने या तीन जखमींना बाहेर काढून रुग्णालयाकडे रवाना केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. जखमींवर उपचार सुरू असून नावे मिळू शकली नाहीत.