File Photo
नागपूर

महावितरण भरारी पथकाने विदर्भात पकडल्या 2,421 वीजचोऱ्या

Nagpur News | 207 ग्राहकांविरोधात गुन्हे दाखल

पुढारी वृत्तसेवा

नागपूर - महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागाअंतर्गत सुरक्षा व अंमजबावणी विभागातील भरारी पथकाकडून एप्रिल 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत संपुर्ण विदर्भातील एकूण 7 हजार 984 ग्राहकांची तपासणी करण्यात आली. यापैकी 2 हजार 421 ग्राहकांकडे वीजचोरी आढळून आली. या ग्राहकांविरूध्द भारतीय विद्युत कायदा 2003, सुधारीत 2007 च्या कलम 135 अन्वये कारवाई करून तब्बल 17.39 कोटी रुपये किंमतीच्या विजचोरीची प्रकरणे उघडकीस आणली. याशिवाय विद्युत कायदा 2003 कलम 126 अन्वये व इतर 1 हजार 466 प्रकरणांमध्ये 14.56 कोटी कोटी रुपये किंमतीच्या वीज वापरातील अनियमितता उघडकीस आणली.

वीज चोरीच्या या सर्व प्रकरणांतून एकूण 31.95 कोटी रुपये इतक्या रकमेचे निर्धारण करून त्यापैकी 26.69 कोटी रुपये संबंधीत ग्राहकांकडून वसूल करण्यात आले. विजचोरीची रक्कम न भरलेल्या 207 वीज ग्राहकांविरूध्द विविध पोलीस स्टेशनमध्ये विजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विदर्भात मंडल स्तरावर 12 भरारी पथके व विभागीय स्तवरावर 3 भरारी पथके तसेच नागपूर व अकोला येथे सुरक्षा व अंमलबजावणी परिमंडल कार्यरत असून त्यांच्यामार्फ़त वीज चोरी विरोधातील ही मोहीम राबविण्यात आली.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, कार्यकारी संचालक (सुरक्षा व अंमजबावणी) अर्पणा गिते (म.पो.से), उप संचालक सुनील थापेकर, उप संचालक (सुरक्षा व अंमजबावणी), नागपूर परिक्षेत्र व त्यांच्या अधिपत्यातील सुरक्षा व अंमलबजावणी विभागातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी हे वीजचोरीमुळे महावितरणचे होणारे आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT