मुंबई: राज्यात झालेल्या पाच जागांच्या अत्यंत चुरशीच्या विधान परिषद निवडणुकीत 'मविआ'ने ३, तर महायुतीने २ जागा जिंकल्या. पुणे शिक्षक मतदारसंघात भाजप, तर अमरावती शिक्षक मतदारसंघात एकनाथ शिंदे शिवसेना उमेदवारांनी विजय मिळवला. पुणे पदवीधर मतदारसंघात आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांची सरशी झाली. नागपूर पदवीधरमधील अटीतटीच्या लढतीत काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी बाजी मारली.
आतापर्यंत 11 उमेदवार बाद ठरविण्यात आले आहेत. विजयी कोटा 88558 मतांचा असून एकाही उमेदवाराने कोटा पूर्ण न केल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजणे सुरू
सतीश चव्हाण यांना आतापर्यंत मिळालेली एकूण मते - 60 हजार 818 मते.
डॉ. प्रतापसिंह पाटील यांना आतापर्यंत मिळालेली एकूण मते - 73 हजार 973 मते.
अपक्ष उमेदवार रविराज साबळे यांना आतापर्यंत मिळालेली मते - 19 हजार 850 मते.
कुठल्याही एका उमेदवारांचा कोटा पूर्ण होईपर्यंत किंवा बादफेरीत अंतिम दोघांमधील सर्वाधिक मते मिळेपर्यंत मतमोजणी राहणार सुरू.
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांच्या विजयाची घोडदौड सुरू असल्याचं चित्र आहे. दुपारी चार ते पाच वाजेपर्यंत त्यांच्या विजयाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रतापसिंह पाटील यांना दिलेला पाठिंबा त्यांच्या विजयासाठी निर्णायक ठरल्याची चर्चा समर्थकांमध्ये सुरू आहे.
महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.
२१ व्या बाद फेरी अंती शिवसेना महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक ४५५५ मतांनी आघाडीवर
किरण सरनाईक दुसऱ्यांदा अमरावती शिक्षक मतदार संघात बाजी मारणार?
काँग्रेस उमेदवार अदिती पोहरे ह्या दुसऱ्या क्रमांकावर शिंदे सेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे तिसऱ्या क्रमांकावर
२१व्या बाद फेरीअंती शिवसेना महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना सर्वाधिक १०६७२मते
काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना ६११७मते
शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ५८८१ मते
पहिल्या पसंतीचा विजयी कोटा कोणीही पूर्ण करू न शकल्याने दुसऱ्या पसंती क्रमांकाची मते मोजली जात आहे...
विजयासाठी १६ हजार १३४ मतांचा कोटा,
कोटा कोण पूर्ण करणार याकडे लागले सर्वांचं लक्ष
विजयासाठी महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना ५४६२ मतांची आवश्यकता
भाजप नेते खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे मतमोजणी प्रक्रियेतून बाद
भाजप आमदार राजेश वानखडे यांचे मेहुणे भाजपचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर भोयर यांनाही धक्का
चंद्रशेखर भोयर मतमोजणी प्रक्रियेतून बाद
महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांची आघाडी कायम
किरण सरनाईक 3 हजार 942 मतांनी आघाडीवर
किरण सरनाईक - 9722
अदिती पोहरे - 5780
श्रीकांत देशपांडे - 5605
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी पूर्ण झाली असून, विजयासाठी ८८,५५८ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. कोणत्याही उमेदवाराने आवश्यक कोटा पूर्ण न केल्याने सर्वांत कमी २३ मते मिळालेले विशाल छाया उद्धव नांदरकर यांना प्रथम वगळण्यात आले. त्यांच्या मतांपैकी १३ मते पुढील पसंतीक्रमानुसार हस्तांतरित झाली, तर १० मते हस्तांतरणास अपात्र ठरली. त्यानंतर ३० मते असलेले अशोक दत्ता हेमके यांची दुसऱ्या टप्प्यात वगळणी करण्यात आली. त्यांच्या मतांपैकी १६ मते हस्तांतरित झाली, तर १४ मते हस्तांतरणास अपात्र ठरली. उर्वरित उमेदवारांच्या मतांची पसंतीक्रमानुसार पुढील मोजणी सुरू असून, अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही.
सध्या दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीसह बाद फेरी सुरू आहे... त्यामध्ये तळाशी असलेले उमेदवार एक एक करून बाद केले जात असून आतापर्यंत 21 उमेदवार बाद करण्यात आले आहे...
मात्र, त्यामध्ये अभिजीत वंजारी हे सुधाकर कोहळे यांच्या पेक्षा काही अंशी जास्त मतदान घेऊन ही कोहळे यांची एकूण आघाडी फारशी कमी करू शकलेले नाही...
सद्यस्थितीत पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीचे मत मिळून सुधाकर कोहळे यांना 60,977 अभिजीत वंजारी यांना 56,693 मते मिळालेली आहे...
त्यामुळे बाद फेरीत 21 उमेदवार बाद ठरल्यानंतर ही सुधाकर कोहळे यांची आघाडी 4284 मतांची आहे....
दरम्यान या मतमोजणीचा निर्णायक पैलू म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर असलेले नितेश कराळे यांच्या मतांमधील दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी ठरेल...
"माझीमते विजयासाठी निर्णायक ठरणार आहेत. माझी लढाई अस्तित्व सिद्ध करण्यासाठी होती. पक्षाने माझा भोंगा म्हणून वापर केला. पक्षाने जर साथ दिली असती तर चित्र अजून वेगळे असते," असे नितेश कराळे यांनी म्हटले आहे. त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. कराळे यांना मिळाली जवळपास 25 हजार मते मिळाली आहेत.
- कोटा निश्चित 88558
- डॉ. प्रतापसिंह पाटील : 73931
- सतीश चव्हाण : 60768
- रविराज साबळे : 19834
- दिलीप घुगे : 8439
- 13 हजार 163 मतांनी डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर
- एकूण मोजलेली मते : 1 लाख 77 हजार 115
- बाद मते : 16 हजार 540
- एकूण वैध मते : 1 लाख 93 हजार 655
- 14627 प्रतापसिंह पाटील यांना मत हवी आहेत कोटा पूर्ण करण्यासाठी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ दुसऱ्या क्रमांकाच्या मतांची मोजणी सुरू
१९ व्या बाद फेरी अंती शिवसेना महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक ३६६० मतांनी आघाडीवर...
काँग्रेस उमेदवार अदिती पोहरे ह्या दुसऱ्या क्रमांकावर शिंदे सेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे तिसऱ्या क्रमांकावर
१९व्या बाद फेरीअंती शिवसेना महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना ९१६८मते
काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना ५५०८मते
शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ५२०२ मते
पहिल्या पसंतीचा विजयी कोटा कोणीही पूर्ण करू न शकल्याने दुसऱ्या पसंती क्रमांकाची मते मोजली जात आहे...
विजयासाठी १६ हजार १३४ मतांचा कोटा,
कोटा कोण पूर्ण करणार याकडे लागले सर्वांचं लक्ष
विजयासाठी महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना ६९६६ मतांची आवश्यकता
अभिजीत वंजारी - 56630
सुधाकर कोहळे - 60924
- कोटा निश्चित 88558
- डॉ. प्रतापसिंह पाटील : 73931
- सतीश चव्हाण : 60768
- रविराज साबळे : 19834
- दिलीप घुगे : 8439
- 13 हजार 163 मतांनी डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर
- एकूण मोजलेली मते : 1 लाख 77 हजार 115
- बाद मते : 16 हजार 540
- एकूण वैध मते : 1 लाख 93 हजार 655
- 14627 प्रतापसिंह पाटील यांना मत हवी आहेत कोटा पूर्ण करण्यासाठी
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ दुसऱ्या क्रमांकाच्या मतांची मोजणी सुरू
सुधाकर कोहळे सध्या 4280 मतांनी पुढे..
सध्या दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीसह बाद फेरी सुरू आहे...
तळाशी असलेले उमेदवार बाद केले जात असून आतापर्यंत 16 उमेदवार बाद करण्यात आले आहे.
मात्र, त्यामध्ये अभिजीत वंजारी हे सुधाकर कोहळे यांच्या पेक्षा काही अंशी जास्त मतदान घेऊन ही कोहळे यांची एकूण आघाडी फारशी कमी करू शकलेले नाही.
सद्यस्थितीत पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीचे मत मिळून सुधाकर कोहळे यांना 60,945 अभिजीत वंजारी यांना 56,665 मते मिळालेली आहे.
त्यामुळे बाद फेरीत 16 उमेदवार बाद ठरल्यानंतर ही सुधाकर कोहळे यांची आघाडी 4280 मतांची आहे.
दरम्यान या मतमोजणीचा निर्णय पैलू म्हणजे तिसऱ्या क्रमांकावर असलेले नितेश कराळे यांच्या मतांमधील दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी ठरेल
गेल्या २५ तासांपासून अमरावती शिक्षक मतदार संघाची मतमोजणी सुरू आहे.
१८ व्या बाद फेरी अंती शिवसेना महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक ३४४१ हजार मतांनी आघाडीवर
काँग्रेस उमेदवार अदिती पोहरे ह्या दुसऱ्या क्रमांकावर शिंदे सेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे तिसऱ्या क्रमांकावर
१८ व्या बाद फेरीअंती शिवसेना महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना ८७९६ मते
काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना ५३५५ मते
शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना ५०३५ मते
पहिल्या पसंतीचा विजयी कोटा कोणीही पूर्ण करू न शकल्याने दुसऱ्या पसंती क्रमांकाची मते मोजली जात आहे...
विजयासाठी १६ हजार १३४ मतांचा कोटा, कोटा कोण पूर्ण करणार याकडे लागले सर्वांचं लक्ष
विजयासाठी महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना ७३३८ मतांची आवश्यकता
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत नितेश कराळे यांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या पसंतीच्या मतांमध्ये अभिजीत वंजारी यांना जास्त मते मिळतात की सुधाकर कोहळेंना यावरच नागपूर मतदार संघाचा निकाल अवलंबित राहण्याची शक्यता आहे. नितेश कराळे यांनी 24,249 मते घेतली असून त्यामध्ये कोहळे आणि वंजारी यांमध्ये कुणाच्या पारड्यात जास्त मतं पडतात यावरच विजयाचे गणित आहे. सध्या दुसऱ्या पसंतीच्या मोजणीत 14 उमेदवार एलिमिनेट झाले असून सुधाकर कोहळे यांची पहिल्या पसंतीमध्ये असलेली 4291 मतांची आघाडी काही प्रमाणात कमी झाली आहे. थोड्या वेळानंतर नितेश कराळे यांच्या 24 हजार 249 मतामध्ये दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू होईल. त्यामध्ये नितेश कराळे यांच्या मतांमधील दुसरे पसंतीचे मत कोणाला बळ देतात, यावरच भाजप आणि काँग्रेसचे भवितव्य निश्चित होईल.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत कालपासून अनेक चिठ्ठ्या कर्मचाऱ्यांच्या हाती.
एका उमेदवाराचा नाम उल्लेख करत थेट चिठीतून शिवीगाळ.
पदवी केली पश्चाताप झाला, एका चिठ्ठीत उल्लेख.
अंशतः मान्यताप्राप्त शाळांना शंभर टक्के अनुदान द्यावे.
एका उमेदवाराचे नाव घेऊन आता थांबा असे उल्लेख.
असला आमदार नको ग बाई म्हणत एका चिठ्ठीत मिळाला उल्लेख.
17 व्या बाद फेरी अंती शिवसेना-महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक 3650 हजार मतांनी आघाडीवर
काँग्रेस उमेदवार अदिती पोहरे दुसऱ्या क्रमांकावर
17 व्या बाद फेरीअंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांना एकूण 8575 मते
काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना 4925 मते
शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 4921 मते
विजयासाठी 16 हजार 134 मतांचा कोटा अपूर्ण
भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांच्या नावासमोर अनेक मतदारांनी मतपत्रिकेवर केवळ २ आकडा लिहिल्याने मतदान अवैध ठरले
मतपत्रिकेवर सुधाकर कोहळे यांच्या नावासमोर २ आकडा लिहिल्याने सुमारे ४ ते ५ हजार मतदान अवैध ठरल्याची माहिती
नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अवैध मतांची नोंद
एकूण १ लाख ६५ हजार ५४१ मतदानापैकी तब्बल १५ हजार १०६ मतदान अवैध ठरले
पदवीधर निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान अवैध झाल्याने पदविधरांच्या मतदान प्रक्रियेवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या 24 तासांपासून अमरावती शिक्षक मतदार संघाची मतमोजणी सुरूच
17 व्या बाद फेरी अंती शिवसेना महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक 3650 हजार मतांनी आघाडीवर
काँग्रेस उमेदवार अदिती पोहरे ह्या शिंदे सेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे यांच्यावर मात करत आल्या दुसऱ्या क्रमांकावर
17 व्या बाद फेरीअंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांना 8575 मते
काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना 4925 मते
शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 4921 मते
पहिल्या पसंतीचा विजयी कोटा कोणीही पूर्ण करू न शकल्याने दुसऱ्या पसंती क्रमांकाची मते मोजली जात आहेत
विजयासाठी 16 हजार 134 मतांचा कोटा, कोटा कोण पूर्ण करणार याकडे लागले सर्वांचं लक्ष
विजयासाठी महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांना 7559 मतांची आवश्यकता
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिसऱ्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. प्रतापसिंह पाटील २३ हजार ३६० मतांनी आघाडीवर आहेत. मात्र, विजयासाठी आवश्यक ८९ हजार मतांचा कोटा अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे आता दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीकडे लक्ष लागलं असून, आज दुपारनंतर अंतिम निकाल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर..
मराठवाडा पदवीधर निवडणुकीचा कोटा ८९ हजार मतांचा
पहिल्या पसंतीची ७८, ५४० मते घेऊन NCP SP डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर
आता दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीवर निकाल अवलंबून
दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी आता सुरू होणार
आज दुपारनंतर अंतिम निकाल येणार
NCP SP डॉ. प्रतापसिंह पाटील : ७८,५४०
NCP AP सतीश चव्हाण : ५५,१८०
रविराज साबळे : २०,४७०
दिलीप घुगे : ८,३६६
२३ हजार ३६० मतांनी डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर
आवश्यक असलेला 75 हजार 438 मतांचा कोटा कोणताही उमेदवार गाठू शकणार नाही. त्यामुळे उमेदवारांचे एलिमीनेशन (बाद होणे) सुरू झाले आहे. अवैध मतांची फेरमोजनी करण्याची सुधाकर कोहळे यांची मागणी आहे. सध्या भाजप उमेदवार सुधाकर कोहळे 4 हजार 294 मतांनी आघाडीवर आहेत. अंतिम निकालात विजयी होणार, असा दावा कोहळे यांनी केला आहे.
NCP SP डॉ. प्रतापसिंह पाटील : ७८,५४०
NCP AP सतीश चव्हाण : ५५,१८०
रविराज साबळे : २०,४७०
दिलीप घुगे : ८,३६६
२३ हजार ३६० मतांनी डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची मागील 18 तासांपासून मतमोजणी सुरू आहे. 15 व्या फेरी अंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक 3517 हजार मतांनी आघाडीवर आहेत. 26 पैकी 15 उमेदवार आता बाद ठरले आहे. काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे दुसऱ्या क्रमांकावर तर शिंदेंच्या शिवसेनेचे बंडोखर उमेदवार श्रीकांत देशपांडे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 15 व्या फेरीअंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांना 8269 मते तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना 4752 मते, शिवसेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे यांना 4732 मते मिळाली आहेत.
प्रतापराव पाटील (शरद पवार राष्ट्रवादी) - 54095 मत.
सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) - 43161 मत.
दिलीप घुगे (ठाकरेंची शिवसेना) - 6218
रविराज साबळे (अपक्ष) 14598
दुसऱ्या फेरी अखेर 1 लाख 40 हजार 543 एवढी मतमोजणी करण्यात आली.
एकूण वैध मतदान - 1 लाख 28 हजार 760
एकूण अवैध मते - 11783
शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील हे 10 हजार 934 मतांनी आघाडीवर.
अधिकृत दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे सुधाकर कोहळे यांना ६०,९२४ मते, तर काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना ५६,६३० मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार नितेश कराळे २४,२४९ मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. मतमोजणीत एकूण १ लाख ५० हजार ८७४ मते वैध ठरली असून तब्बल १५,१०६ मते अवैध ठरली आहेत. दरम्यान, या अवैध मतांची पुन्हा मोजणी करावी, अशी मागणी भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी केली
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयाचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे. दुसऱ्या फेरीअखेर भाजपचे सुधाकर कोहळे यांनी ४,२९४ मतांची आघाडी घेतली असली, तरी कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला ७५,४३८ मतांचा 'कोटा' गाठता आलेला नाही. त्यामुळे आता दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी सुरू करण्यात आली आहे.
संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या बहुचर्चित निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून पहिल्या फेरीअखेरचा अधिकृत कल समोर आला आहे. पहिल्या फेरीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी जोरदार मुसंडी मारत ७ हजार ८७८ मतांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि विद्यमान आमदार सतीश चव्हाण हे दुसऱ्या क्रमांकावर पिछाडीवर पडले आहेत.
पहिल्या फेरीत एकूण ७० हजार ५१९ मतांची मोजणी पूर्ण झाली. यामध्ये ६४ हजार ८१० मते वैध ठरली असून, तब्बल ५ हजार ७०९ मते अवैध ठरली आहेत.
पहिल्या पसंतीच्या मतांच्या मोजणीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांना २७ हजार ९९४ मते मिळाली, तर सतीश चव्हाण यांना २० हजार ११६ मते मिळाली आहेत. त्यामुळे पहिल्या फेरीअखेर पाटील यांनी ७ हजार ८७८ मतांची भक्कम आघाडी मिळवली आहे. इतर उमेदवारांमध्ये रविराज साबळे यांनी ७ हजार ४२४ मते घेत लक्षवेधी लढत दिली आहे, तर दिलीप घुगे यांना ३ हजार १६२ मते मिळाली आहेत.
पहिल्या फेरीतील या अनपेक्षित आणि मोठ्या आघाडीमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून, पुढील फेऱ्यांमध्ये ही आघाडी कायम राहते की मतांचा कल बदलतो, याकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.
एकूण मोजलेली मते : ७०,५१९
एकूण वैध मते : ६४,८१०
अवैध मते : ५,७०९
उमेदवारनिहाय मिळालेली मते:
डॉ. प्रतापसिंह पाटील : २७,९९४ मते (७,८७८ मतांची आघाडी)
सतीश चव्हाण : २०,११६ मते
रविराज साबळे : ७,४२४ मते
दिलीप घुगे : ३,१६२ मते
अमरावती शिक्षक मतदार संघ मतमोजणीत 3 फेरीत 33 हजार 34 मतांची मोजणी पूर्ण झाली असून तीनही फेरी मिळून शिंदे सेनेचे किरण सरनाईक 3474 मतांनी आघाडीवर आहेत. तर काँग्रेसच्या अदिती पोहरे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. शिंदे सेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या तिनही फेरीतील एकूण अवैद्य मते - 768 असून कोटा पूर्ण करण्यासाठी मतांची गरज 16 हजार 134, विजयी होण्यासाठी शिंदे सेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांना कोटा पूर्ण करण्यासाठी 7 हजार 972 मतांची गरज
तीनही फेरीत उमेदवारांना मिळालेली एकूण मते...
किरण सरनाईक शिंदे सेना - 8162
अदिती पोहरे काँग्रेस - 4688
श्रीकांत देशपांडे शिंदे बंडखोर - 4668
पहिल्या पसंती क्रमाच्या मतगणनेची तिसरी व अंतिम फेरी पूर्ण झाली असून तिन्ही फेरी मिळून ३३ हजार ३४ मत मोजण्यात आले. असून ३ फेरी अखेर एकूण ३३,०३४ मतांची मोजणी पूर्ण झाली आहे
तिन्ही फेरी मिळून एकूण वैध मते : ३२,२६६
तीनही फेरी मिळून एकूण अवैध मते: ७६८
विजयासाठी मतांचा कोटा : १६,१४३.
दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीला सुरुवात अर्थात बाद फेरीला सुरुवात झाली आहे .
नागपूर पदवीधर मतदारसंघाचे पहिल्या फेरीचे अधिकृत निकाल जाहिर झाले असून यामध्ये काँग्रेसच्या अभिजीत वंजारी यांनी आघाडी घेतली आहे.
उमेदवारांना पडलेली मते
28998 अभिजीत वंजारी,काँग्रेस
28071 सुधाकर कोहळे,भाजप
14708 नितेश कराळे,अपक्ष
99 अनिल सोले
84003 एकूण मत
76875 वैध मत
7128 रद्द मते
927 मताने काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी आघाडीवर
संभाजीनगर पदवीधर मतदासंघात आतापर्यंत 44494 मतांची मोजणी.. त्यापैकी 40 हजार 900 वैध. ठरली आहेत उमेदवारांना पडलेली मते पुढीलप्रमाणसे
डॉ.प्रतापसिंह पाटील - (शरद पवार यांची राष्ट्रवादी ) 17704 मते
सतीश चव्हाण- (राष्ट्रवादी) 12738
रविराज साबळे (अपक्ष) 4669
दिलीप घुगे( ठाकरेंची शिवसेना) 1926 मते
4934 मतांनी प्रतापसिंह पाटील आघाडीवर आहेत
एकूण 43% टक्के मते प्रतापसिंह पाटील यांना...
सतीश चव्हाण या 31% टक्के मते.
साबळे यांना 11 टक्के व घुगे यांना 8 टक्के मते आहेत
अमरावती शिक्षक मतदारसंघात दुसऱ्या फेरीअखेर शिंदे सेनेचे किरण सरनाईक आघाडीवर आले आहेत त्यांना एकूण 3042 मताची आघाडी मिळाली आहे.
दुसऱ्या फेरी अखेर प्रमुख 3 उमेदवारांना मिळालेली मते..
किरण सरनाईक महायुती शिंदे गट - 3903+3334=6643
श्रीकांत देशपांडे शिंदे बंडखोर - 2209+1986=4195
आदिती पोहरे काँग्रेस - 1319+2265=3584
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीत पहिल्या फेरीत पुढील प्रमाणे मते मिळाली आहेत
अभिजीत वंजारी 28 हजार 536
सुधाकर कोहळे 27 हजार 751
नितेश कराळे 14 हजार 243
पहिल्या फेरी अखेरीस काँग्रेसचे अभिजीत वंजारी 785 मतांनी आघाडीवर आहेत
अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूकीत दुसऱ्या फेरीची १४ हजार मतांची मोजणी पूर्ण झाली असून आतापर्यंत एकूण २८ हजार मतांची मोजणी पार पडलली आहे. थोड्याच वेळात दुसऱ्या फेरीत उमेदवारांना मिळालेली मतांचे अधिकृत आकडेवारी येणार आहे. तिसऱ्या फेरीतील मतमोजणीला सुरुवात, तिसरी फेरी ५ हजार ३४ मतांची असणार आहे. प्रत्येकी दहा टेबलवर ५०० बॅलेट पेपरची मोजणी होणार... तर अकराव्या टेबलवर केवळ ३४ बॅलेट पेपरची मोजणी केली जाणार
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूकीची दुसऱ्या फेरीच्या मतमोजणी सुरु असून या फेरीत शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांनी आघाडी घेतली आहे एकूण 14 पैकी 9 टेबलवर किरण सरनाईक यांना आघाडी मिळाली आहे.
मतमोजणी केंद्रावर 84 टेबल वर 1000 प्रमाणे मत मोजणी केली जात आहे. पहिल्या टप्प्यात एकूण 84000 हजार पैकी मोठ्या संख्येने मत अवैध ठरली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पहिल्या फेरीची अधिकृत आकडेवारी जाहीर झाली नाही. थोड्या वेळात दुसऱ्या टप्प्यातील 81 हजार मतांची मोजणी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील अवैद्य मत दूर केल्यावर ठरणार विजयाचा कोटा, आता पर्यन्त भाजप उमेदवार सुधाकर कोहळे, काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी यांच्यात काट्याची टक्कर तर नितेश कराळे यांची देखील आघाडी, नितेश कराळे किंग मेकर ठरण्याची शक्यता आहे. उद्या दुपारी पर्यंत मतमोजणी पूर्ण होणार असल्याचा अंदाज व्यक्त जात आहे.
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठी अपडेट समोर आली असून, काही वेळा पूर्वी आघाडीवर असलेले सतीश चव्हाण पिछाडीवर गेले असून प्रतापसिंह पाटील 4800 मतांनी आघाडीवर आले आहे. अजून पहिली फेरी सुरू असून पूर्ण संपलेली नाही. काही वेळात पहिली फेरी पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सुधाकर कोहळे -86
अभिजीत वंजारी- 101
इतर-22
४९४ वैध मतांच्या मोजणीत सतीश चव्हाण आघाडीवर तर डॉ. प्रतापसिंह पाटील पिछाडीवर आहेत.
सुरुवातीच्या ३०० मतांच्या मोजणीत सतीश चव्हाण यांना १३७ तर डॉ. प्रतापसिंह पाटील यांना १०० मते पडली आहेत.
शिवसेना ठाकरे पक्षाचे दिलीप घुगे यांना ३१ मते तर रविराज साबळे यांना १९ पोस्टल मते पडली असून टपाली मतदानात ३७ मतांनी सतीश चव्हाण आघाडीवर आहेत.
नागपूर येथे सुरु असेलेल्या पदवीधर निवडणूकीच्या मतमोजनी केंद्रावर मतमोजणी टेबलवर प्रत्येक उमेदवाराच्या पेट्या नसल्याने अपक्ष उमेदवार संतप्त झाले आहेत. टेबलवर ३८ उमेदवारांच्या नावाच्या पेट्या असणे आवश्यक आहे,पण केवळ 5 ते 7 उमेदवारांच्या नावाच्या पेट्या ठेवण्यात आल्याने अपक्ष उमेदवार नाराज झाले आहेत. अपक्ष उमेदवारांचे मत मोजले का जात नाहीत,असा त्यांचा सवाल आहे. तसेच मतमोजणी प्रक्रिया रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर विरोधी उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनी बाहेर हकल्याचा आरोप ही करण्यात आला आहे.
सुरुवातीच्या 200 मतांच्या मोजणीत सतीश चव्हाण यांना 67 तर डॉ. प्रतापसिंह पाटील यांना 64 मते. टपाली मतदानात 3 मतांनी सतीश चव्हाण आघाडीवर काही वेळापूर्वीच डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर होते ते पुन्हा पिछाडीवर गेले आहेत.
महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांची आघाडी कायम
सरनाईक यांच्या पाठोपाठ शिंदे यांच्या शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनाही मोठ्या प्रमाणात मतदान
काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे पिछाडीवर
अदिती पोहरे पहिल्या पसंती क्रमात सध्या तिसऱ्या क्रमांकावर असण्याची शक्यता
किरण सरनाईक आणि श्रीकांत देशपांडे यांच्या अटीतटीची लढत सुरू
मराठवाडा पदवीधर निवडणूक मतमोजणी
पोस्टल मतांची मोजणी सुरू, 515 पोस्टल मतदान त्यापैकी 21 मतदान बाद
494 वैध मतांच्या सुरुवातीच्या मोजणीत डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर
सुरुवातीच्या ३० मतांच्या मोजणीत १३ मते डॉ. प्रतापसिंह पाटील तर ११ मते सतीश चव्हाण यांना मिळाली आहेत.
पहिल्या फेरीच्या मतमोजणीमध्ये टेबल क्रमांक 38 वर गोंधळ
मतदान प्रक्रियेत कर्मचारी अवैद्य मत ग्राह्य धरत असल्याचा भाजप कार्यकर्त्याचा आक्षेप
भाजप चे सुधाकर कोहळे, काँग्रेस चे अभिजित वंजारी यांच्या मध्ये चुरस
"धाकधूक मला नाही, मी हरलो काय नी जिंकलो काय, जे मोठ्या राजकीय पक्षाकडून उभे आहेत त्यांना धाकधूक आहे. माजी आमदार,शैक्षणिक संस्था आहेत त्यांना वारंवार उमेदवारी देतात. माझ्या बाजूने निकाल लागला तर पक्षांना चपराक बसेल की काम करणाऱ्या माणसांना उमेदवारी दिली नाही तर जनता पक्षाला डावलु शकते. मतमोजणी दुसऱ्या फेरीत जाऊ शकते. एका मतपेटीतून जास्त मतपत्रिका निघाल्या,यावर आमचा आक्षेप आहे,त्यावर आम्ही आक्षेप नोंदविला आहे. देवा भाऊंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती," असे नागपूर पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांनी म्हटले आहे.
1 लाख 65 हजार 909 मतांची होणार मतमोजणी
पोस्टल बलेट मध्ये 34 मत ठरली अवैद्य
सुरुवातीला अवैद्य मत वेगळे केले जातील, त्यानंतर कोटा ठरवून पहिल्या पसंतीच्या मतमोजणीला होणार सुरुवात
अमरावती शिक्षक मतदार संघाचे शिंदे गटाचे उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर आहेत.
मागील एक तासापासून पहिली फेरी सुरूच आहे. किरण सरनाईक 14 टेबलवर आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार अदिती पोहरे पिछाडीवर आहेत.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया रद्द करण्यात यावी या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांसमोर दाखल करण्यात आलेल्या याचिकेत याचिकाकर्त्याने आवश्यक सुधारणा करावी असे निर्देश देत खंडपीठाने पुढील सुनावणी दोन नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.
या प्रकरणातील याचिकाकर्ते सचिन काळबांडे यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नियमानुसार वेळेत (उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे अखेरच्या दिवसापर्यंत) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली नसल्याचा आरोप करत उच्च न्यायालयासमोर याचिका केली होती.
मतमोजणी दरम्यान मतमोजणी केंद्रावर अपघात
उपविभागीय अधिकारी डॉ. पुरी यांना इजा झाल्याची माहिती
वैद्यकीय पथकाकडून डॉक्टर पुरी यांची तपासणी सुरू
डॉ. पुरी यांच्या उपचारासाठी रुग्णवाहीकेला केले पाचारण
डॉ. पुरी यांच्यावर प्रथमोपचार सुरू
अमरावतीत मतपत्रिकांचे 14 टेबलवर 25 - 25 चे असे 40 गट्टे तयार
प्रत्येक टेबलवर 1 हजार मतपत्रिकाची होणार मतमोजणी..
14 टेबलवर 14 हजार मतपत्रिकांची मोजणी होणार..
थोड्याच वेळात मतमोजणीला होणार सुरुवात
छत्रपती संभाजीनगर : मतपत्रिकेचे 25 - 25 चे गठ्ठे करण्याचे काम 80 टक्के पूर्ण.
आणखी एक तास लागेल गठ्ठे तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी
तासाभरात 1 लाख 91 हजार 689 मतपत्रिकेचे गठ्ठे होणार पूर्ण.
त्यानंतर साधारणपणे दीड वाजता एकत्रित केलेल्या मतपत्रिकेच्या गठ्ठ्याचे टेबलवर वितरण केले जाणार
पहिली फेरी अडीच ते तीन वाजता होईल, त्यात पहिला कल लक्षात येईल
पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणीसाठी तीन फेऱ्या होणार
25-25 मतपत्रिकांचे गठ्ठे तयार...
आता थोड्या वेळाने मतमोजणीला सुरुवात होईल...
सध्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा लंच ब्रेक..
अमरावती शहरातील लोकशाही भवन याठिकाणी सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला झाली सुरुवात...
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 84 टेबलवरून मतमोजणी सुरू आहे. प्राथमिक मतमोजणींतर्गत गठ्ठे लावणीचा 4 था राऊंड सध्या सुरू आहे. गठ्ठे लावणीचे एकूण 5.30 राऊंड होणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष उमेदवारांना पसंतीक्रमानुसार मिळालेल्या मतांच्या मोजणीस सुरूवात होईल.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी आज मंगळवारी सकाळी सुरू झाली. दुपारनंतरच प्राथमिक कल येण्याची शक्यता आहे. टपाली मतपत्रिका विचार करता एकूण सर्व २३८ टपाली मतपत्रिकांची प्राथमिक मोजणी पूर्ण झाली असून एकूण टपाली मतपत्रिकांपैकी 34 टपाली मतपत्रिका अवैध ठरल्या. उर्वरित 204 मतपत्रिका वैध ठरल्या असून नियमित मतमोजणीत या टपाली मतपत्रिकांची मोजणी केली जाणार आहे.
नागपूर पदवीधर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार नितेश कराळे मास्तर यांनी विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. अनपेक्षित ऐतिहासिक निकाल लागेल. पहिल्या फेरीत मला ४० ते ४५ हजार मते मिळतील आणि दुसऱ्या फेरीत माझा विजय होईल. बीजेपीवर लोकांचा रोष आहे. बीजेपीचा उमेदवार देवा भाऊच्या पलीकडे जाऊन बोलू शकत नाही आणि काँग्रेसच्या उमेदवाराने सहा वर्षात कामे न केल्याने त्यांच्यावर पदवीधर नाराज असल्याचे कराळे मास्तरांनी म्हटले आहे.
नागपूरमध्ये अनेक मतदारांनी मतपत्रिकेत उमेदवारांच्या नावा समोर पसंतीक्रमांक देण्याऐवजी टिकमार्क केल्याने अवैध मतांचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे.
एकूण झालेले मतदान 1 लाख 65 हजार 541
१) सर्वात आधी प्रत्येक बॅलेट बॉक्समध्ये ( मतपेटीत) असलेले एकूण मते बाहेर काढून संबंधित मतदान केंद्राच्या अधिकाऱ्याने त्या बॅलेट बॉक्स संदर्भात फॉर्म नंबर 16 (1) मध्ये नमूद केलेल्या संख्येशी प्रत्यक्ष असलेल्या मतपत्रिकांची संख्या जुळवली जाईल...
२) त्याच वेळेस प्रत्येक बॅलेट बॉक्स मधील मतांचे 25 - 25 मतांचे गठ्ठे बनवले जाईल... ( गठ्ठे बनवताना मताची घडी (फोल्ड) उघडले जाणार नाही...
३) त्यानंतर सर्व गठ्ठे एका मोठ्या हौदमध्ये मिसळले जातील... (म्हणजेच सर्व 1 लाख 65 हजार 541 मतं हौदमध्ये मिसळले जातील..)
४) त्यानंतर मतमोजणीच्या प्रत्येक टेबलावर 25 - 25 च्या गठ्ठ्यांच्या स्वरूपात 1000 मतं मोजणीसाठी दिले जाईल (नागपूरच्या मतमोजणीसाठी 84 टेबल असल्यामुळे या पहिल्या फेरीत 84 हजार मतं मोजणीसाठी येतील...)
५) पहिल्या फेरीत प्रत्येक टेबलवर आलेल्या 1000 मतांना उघडून त्यामध्ये पहिल्या पसंतीचे मत ज्या उमेदवाराला असेल, ते त्या उमेदवाराच्या नावाच्या पिजन बॉक्समध्ये (उमेदवारांचे नाव असलेले खर्ड्याचे छोटे छोटे बॉक्स) टाकले जातील...
६) याच वेळेस अवैध मत बाजूला ठेवले जातील...
७) त्यानंतर दुसऱ्या फेरीत पुन्हा सर्व 84 टेबलावर प्रत्येकी 1 हजार. मतं मोजण्यासाठी दिले जातील..
८) पुन्हा पहिल्या फेरी सारखीच प्रक्रिया या फेरीत राबवून पहिल्या पसंती क्रमांकानुसार उमेदवारांच्या पिजन बॉक्समध्ये ते मत टाकले जातील...
९) दुसऱ्या फेरीच्या अखेरीस सर्व अवैध मत वेगळे झाल्यामुळे विजयाचा कोटा निश्चित होईल...
१०) जर पहिल्या दोन्ही फेरीत मिळून एखादा उमेदवार विजयाच्या कोट्यापर्यंत पोहोचला असेल, तर त्याला निवडणूक आयोगाच्या परवानगीनुसार विजयी घोषित केली जाईल...
११) जर पहिल्या पसंतीच्या मतांच्या आधारे कोणताही उमेदवार विजयाच्या कोट्यापर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरल्यास एलिमिनेशन चा राऊंड सुरू होईल...
१२) एलिमिनेशनच्या राऊंडमध्ये पहिल्या पसंतीच्या मतानुसार सर्वात अखेरच्या उमेदवाराला बाद करत त्याच्या मतांमधील दुसऱ्या पसंतीचे मत कोणत्या उमेदवाराला होते, ते त्या उमेदवाराला हस्तांतरित केले जातील...
१३) अशा पद्धतीने एखादा उमेदवार विजयाचा कोटा गाठत नाही तोवर एक एक उमेदवाराची एलिमिनेशन करत मतमोजणीची प्रक्रिया सुरू राहील...
"ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली होती. सर्वांनी मला मदत केली. या निवडणुकीत आम्ही व्हिजन घेऊन उतरलो होतो. आम्ही विरोधकांवर टीका करण्यापेक्षा व्हिजन पदवीधरांसमोर मांडला आहे. त्यामुळे मी पहिल्या फेरीत निवडून येईल," असा विश्वास शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतमोजणी सुरू होत आहे. त्यासाठी भाजपाच्या बंडखोर उमेदवार तथा राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे या अमरावतीच्या लोकशाही भवनमध्ये मतमोजणी प्रक्रियेसाठी दाखल झाल्या आहे. माझे भाऊ अनिल बोंडे यांचा मला आशीर्वाद आहे, अशी प्रतिक्रिया संगीता शिंदे यांनी दिली आहे.
मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर दुपारपर्यंत टपाली व सर्व मतपेट्या उघडून गठे तयार करण्याची प्रक्रिया होईल. सायंकाळी ५ वाजेनंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होईल. तेव्हाच मतांचा कोटा निश्चित होईल.
मराठवाडा पदवीधर मतदार संघासाठी चिकलठाणा एमआयडीसीतील रेसोनेट लॉजिस्टिक्स एलएलपी येथे मतमोजणी प्रारंभ होत आहे. त्यासाठी ४४५५ अधिकारी - कर्मचारी तैनात आहेत. ४१ उमेदवारांचे भवितव्य ठरविणासाठी एकाच वेळी ७० टेबलवर मतमोजणीला सुरुवात होणार आहे. १३ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. बॅलेट पेपरमुळे निकालाला किमान दीड दिवस लागण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील विधानपरिषद निवडणुकांसाठी मतमोजणी
उत्तर प्रदेशातील ११, बिहारमधील ८, महाराष्ट्रातील ५ आणि कर्नाटकातील ४ जागांसाठी होणार मतमोजणी
सर्व २८ जागांचे निकाल आज रात्री उशिरापर्यंत जाहीर होण्याची शक्यता.
70 टेबलांवर 13 फेऱ्यांमध्ये होणार प्राथमिक मतमोजणी
8 जिल्ह्यांतील 842 मतदान केंद्रांवरील मतपत्रिकांची मोजणी
41 उमेदवार रिंगणात; 1 लाख 91 हजार 689 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
पहिल्या पसंतीच्या मतांनंतर कोटा पूर्ण न झाल्यास पुढील पसंतीक्रमानुसार मतांचे हस्तांतरण.
एकूण नोंदणीकृत मतदार - 3,26,700
एकूण मतदान - 1,91,689
एकूण मतदानाची टक्केवारी - 58.67%
जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी
धाराशिव - 62.53%
परभणी - 61.81%
हिंगोली - 61.58%
जालना - 59.81%
नांदेड - 59.81%
बीड - 59.68%
लातूर - 56.45%
छत्रपती संभाजीनगर - 55.73%
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण 38 उमेदवार रिंगणात आहेत. नागपूर विभागीय क्रीडा संकुलात सकाळी आठ वाजता पासून ८४ टेबलवर होणार मतमोजणी
३८ उमेदवारांच्या भाग्याचा आज होणार फैसला
दुपारपर्यंत मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करुन मतमोजणी सुरु होईल
त्यानंतर उर्वरित मतांची मोजणी केली जाईल, रात्री आठ पर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होईल
एकदा वैध मते निश्चित झाल्यानंतर विजयी उमेदवारासाठीचा विजयाचा कोटा निश्चित केला जाईल...
त्यानंतर पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये जर एखादा उमेदवार त्या कोट्यापर्यंत पोहोचत असेल तर त्याला विजयी घोषित केले जाईल.
अन्यथा दुसऱ्या, तिसऱ्या आणि त्यानंतर पुढच्या पसंतीच्या मतांची मोजणी करून कोणता उमेदवार विजयाच्या कोट्यापर्यंत आधी पोहोचतो हे पाहिले जाईल...
जोपर्यंत एखादा उमेदवार विजयाच्या कोट्यापर्यंत पोहोचत नाही, तोवर पसंतीक्रमानुसार मतमोजणी सुरू राहील.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी 64.76% मतदान झाले आहे. म्हणजेच 2 लाख 55 हजार 603 मतदारांपैकी 1 लाख 65 हजार 541 मतदारांनी मतदान केले आहे.
जिल्हावार मतदान टक्केवारी
नागपूर 60.3 %
भंडारा 67.07%
गोंदिया 71.53%
वर्धा 68.37%
चंद्रपूर 72.59%
गडचिरोली 72.95%
Maharashtra Vidhan Parishad Result Live Updates:
राज्यभराचे लक्ष लागलेल्या विधान परिषदेच्या ५ जागांसाठी आज मतमोजणीचा रणसंग्राम रंगणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होत असून, ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघांच्या या रणधुमाळीत तब्बल १८२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य उघडणार आहे. नागपूर, अमरावती, पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमधील या काट्याच्या टक्करमध्ये महायुती बाजी मारणार की महाविकास आघाडी बाजी पलटवणार? क्षणाक्षणाचे अपडेट्स मिळवा LIVE...