Nagpur factory blast 
नागपूर

SBL Energy blast Nagpur | SBL स्फोट प्रकरणात मालक, संचालकासह 10 जणांविरोधात लुक आऊट नोटीस

देश सोडून पसार होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी चौधरीसह १० आरोपीविरुद्ध सर्क्युलर जारी केले आहे

पुढारी वृत्तसेवा

नागपूर : रविवारी (1 मार्च ) झालेल्या एसबीएल स्फोट प्रकरणात चौधरी बंधूसह 21 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. 11 जणांना अटक झाल्यानंतर इतर आरोपी विदेशात पळून जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी कंपनीचे मालक आलोक चौधरी (रायपूर छतीसगड) यांच्यासह १० आरोपीविषद्ध लुकआउट नोटीस काढली आहे. यात संजय चौधरी यांचाही समावेश आहे.

एसबीएल या कंपनीत रविवारी सकाळी भीषण स्फोट होऊन १९ कामगारांचा मृत्यू तर २३ जण जखमी झाले. या घटनेची गंभीर दखल घेत कळमेश्वर पोलिसांनी मुख्य आरोपी चौधरी बंधूसह 21 जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.यापूर्वी चौधरी बंधूच्या अटकेसाठी पोलिस पथक रायपूर पेथे गेले. मात्र न सापडल्याने परत आले. चौधरी बंधू देश सोडून पसार होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी चौधरीसह १० आरोपीविरुद्ध लूकआउट सर्क्युलर जारी केले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी संचालकद्धय रवी प्रकाशचंद्र कामरा (वय ६५, रा. देवेंद्रनगर, राथपूर, छत्तीसगड), राकेश सुदर्शन तिवारी (वय ६९, रा. नर्मदा कॉलनी, काटोल रोड), उपाध्यक्ष चंद्रशेखर ब्रिजमोहन रजवाड (वय ५०, रा. रचना अपार्टमेंट, अंबाझरी), वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप हिंमतलाल सोळंकी वय 62, महाराणा बिल्डर,काटोल रोड, महाव्यवस्थापक प्रदीप रघुनाथ शर्मा (वय ५७, रा. जय विघ्नहर्ता सोसायटी, काटोल रोड), प्रोडक्शन मैनेजर रोशन भास्कर राऊत (वय ४३, रा. दत्तवाडी, व्यवस्थापक फिलिंग, नीलकंठ ठाणीराम डोंगरे (वय ४८, रा. वासंती अपार्टमेंट, दाभा, पंकज रामनरेश पांडे वय 32, रा. बेसा,सुधाकर उपरकर, वय 43, राहणार कोहली,कळमेश्वर, राजेंद्र देवराव पारधी वय 42, डोरली भिंगारे, विलास अंकुश माळवे, चिटणीस नगर आदींना अटक केली असून सर्वांना 7 मार्चपर्यंत न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT