नागपूर : राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आदर्श आचार संहिता सुरू असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाईत परराज्यातील मद्याचा साठा जप्त केला आहे. जरीपटका पोलीस स्टेशन नागपूर हद्दीत, ओम नगर येथील विजय धरमदास आसुदाणी यांच्या संत ज्ञानेश्वर सोसायटी, प्लॉट कमांक ३१ येथून हा मद्याचा साठा जप्त करण्यात आला.
राज्यात प्रतिबंधित असलेला आणि हरियाणा राज्यात विक्रीसाठी असलेला मद्यसाठा महाराष्ट्र राज्यात अवैधपणे विक्रीकरीता आणलेला होता. यात स्कॉच, वोडका आणि इतर मद्य होते. या साठ्याचा मालक अमित भागचंद चेलानी याला सापळा रचून पकडण्यात पोलिसांना यश आले. मद्याच्या ४४८ सीलबंद बाटल्या तसेच मोबाईल आणि वाहनासह एकुण ३८ लाख ६९ हजार ४३१ रूपयांचा मुद्येमाल जप्त करीत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
वाहन चालक अमित भागचंद चेलानी, सहाय्यक राजकुमार हिरानंद रामदासाणी तसेच घरमालक विजय धरमदास आसुदाणी या तीन इसमांना अटक करण्यात आली. निरीक्षक मंगेश कावळे, शैलेश अजमिरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक शिरीष देशमुख, समीर सईद व जवान सर्वश्री धवल तिजारे, अंकुश भोकरे, प्रशांत घावले यांनी कारवाईत परिश्रम घेतले. या गुन्हयाचा तपास विकम मोरे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, ब विभाग, नागपूर हे करीत आहेत.