Nagpur Pardi Naka Leopard news
नागपूर : नागपुरातील दाट वस्ती असलेल्या पारडी क्षेत्रातील महानगरपालिकेच्या 5 नंबर नाक्याजवळ सोमवारी (दि.८) बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिक दहशतीत आहेत.
यापूर्वी भांडेवाडी परिसरात राऊत यांच्या निवासस्थानी एक दुसऱ्या माळ्यावर बिबट्याने बसस्थान मांडले होते. सुमारे तीन ते चार तास झुंज देत अखेर वनविभाग पोलीस आणि रेस्क्यू टीमने या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले आणि नंतर त्यांना अधिवासात मुक्त केले होते.
आता पुन्हा एकदा दुसऱ्या बिबट्याने शहराच्या सीमावरती पारडी भागात हजेरी लावल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्यास्थितीत पॉवर हाउस जवळील खुल्या जागेत हा बिबट्या शिरलेला असल्याचे सांगितले जात असून वनविभाग, रेस्क्यू टीमची प्रतीक्षा केली जात आहे. प्रत्यक्ष वनविभागाने मात्र बिबट्याचे लोकेशन मिळाले नसल्याचे स्पष्ट केले.