In Vidarbha, farmers should have died due to non-remediation of farmers' issues
विदर्भात शेतकऱ्यांच्या प्रश्न कारणी न लावल्यामुळे शेतकऱ्यांनी मृत्यूला घेतले कवेत file photo
नागपूर

विदर्भात 48 तासांत पाच शेतकर्‍यांनी संपवली जीवनयात्रा !

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : मागील दोन दिवसांमध्ये यवतमाळमध्ये आणि चंद्रपूरमध्ये प्रत्येकी दोन आणि भंडाऱ्यात एका शेतकर्‍यांनी जीवन संपवले आहे. या प्रकरणाकडे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी राज्य आणि केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. गतवर्षी झालेले शेतीतील नुकसान तसेच सरकारी मदत न मिळाल्यामुळे आणि बँकांनी पीककर्ज वाटप रोखल्याने या घटना घडत आहेत. सरकारने या घटना रोखण्यासाठी तत्काळ पावले उचलावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

किशोर तिवारी यांनी 2015 ते 2021 पर्यंत वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनवर शेतकर्‍यांचे मृत्यू रोखण्यासाठी एकात्मिक कार्यक्रमसुद्धा सादर केला होता. मात्र केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही प्रकरणे प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. मागील 48 तासांत विनोद ढोरे (भंडारा), भोजराज राऊत (चोरटी), नीळकंठ प्रधान (रणमोचन), बन्सी पवार (गांधीनगर) आणि दादाराव बोबडे (गगनमाळ) यांनी शेतीतील परिस्थितीला कंटाळून आपले जीवन संपवले आहे. यावर्षी जूनपर्यंत पश्चिम विदर्भात 694 तर पूर्व विदर्भात 228 शेतकर्‍यांनी जीवन संपवले आहे. ह्या सर्व घटना चुकीच्या धोरणामुळे होत असून त्याकडे केंद्र सरकारने तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.

विदर्भात फक्त 45 टक्के पीक कर्जवाटप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार पीक कर्जमाफीचे संकेत दिले आहेत. विदर्भात प्रचंड शेतीचे नुकसान झाल्यामुळे कापूस आणि सोयाबीनला भाव मिळाला नाही. दुष्काळ सदृश्यस्थिती असूनही घोषित केला नाही. या बरोबरच शेतातील नुकसानीबद्दल पीकविमा देखील मिळाला नाही. 30 जूनपर्यंत पीक कर्जवाटप फक्त 45 टक्के झाले असून यामुळे पश्चिम पाठोपाठ आता पूर्व विदर्भातही शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे लोण पोहआल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT