HMPV विषाणूसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जनतेला आवाहन केले आहे.  Pudhari Photo
नागपूर

HMPV विषाणूसंदर्भात घाबरू नका : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

HMPV Virus | जनतेच्या मनात भीती पसरवू नका

पुढारी वृत्तसेवा

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : एचएमपीव्ही विषाणू संदर्भात (HMPV Virus) सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यात काळजीचे कोणतेही कारण नाही. उगीच घाबरू नका, काळजी घ्या, यासोबतच जनतेच्या मनात भीती पसरवू नका. सोशल मीडियावर चुकीची माहिती कोणीही पसरवू नये. नागरिकांनी घाबरून न जाता जी काळजी आपण इतर साथीच्या आजारात घेतो. तीच काळजी घ्यावी, असे आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.

सध्या नागपुरात एचएमपीव्ही (HMPV Virus) आजाराचे खासगीत उपचार घेतलेले दोन रुग्ण १ जानेवारीला सकारात्मक असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने सर्वसामान्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहशतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी माध्यमांशी संवाद साधला. हे जे दोन रुग्ण ७ आणि १३ वर्षीय होते. ते चालत फिरत सुखरूप आहेत. संशयित असले तरी त्यांचा नमुना एनआयव्ही आणि एम्स मध्ये पाठविण्यात आला असून त्या विषयाची खात्री केली जाईल. तोवर कुणीही घाबरू नये, असे आवाहन डॉ. इटणकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT