‘राज्यस्तरीय हातमाग विणकर स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस’ आणि ‘रेशीमरत्न पुरस्कार’ समारोहात चंद्रकांत पाटील व इतर मान्यवर  Pudhari Photo
नागपूर

नागपूर : 60 व्या वर्षापर्यंत कार्यरत हातमाग विणकरांना लवकरच पेंशन!

वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय हातमाग पुरस्कार वितरण

पुढारी वृत्तसेवा

आव्हानांना सामोरे जात पिढ्यानपिढ्या कलेला जीवंत ठेवण्यासमवेत त्यात आपल्या कौशल्यातून भर टाकणाऱ्या वयाच्या 60 वर्षापर्यंत कार्यरत हातमाग विणकरांना पेंशन देण्याचा निर्णय लवकरच होईल असे वक्तव्य वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. राष्ट्रीय हातमागदिनानिमित्त गुरुवारी (दि.9) नियोजन सभागृहात आयोजित राज्यस्तरीय हातमाग विणकर स्पर्धेतील बक्षीस वितरण सभारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात रेशीम संचालनालयाच्या संकेतस्थळाचे उद्घाटनही करण्यात आले. यावेळी वस्त्रोद्योग आयुक्त अविश्यांत पंडा, रेशीम संचालनालयाच्या संचालिका वसुमना पंत व मान्यवर उपस्थित होते.

हे आहेत विजेते

राष्ट्रीय हातमाग कापड स्पर्धेतील वॅल हँगीग (संत कबीर) या प्रकारात सोलापूर येथील राजेंद्र सुदर्शन अंगम यांनी 50 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळाले. पैठणी ब्रोकेट साडी या वाणाच्या प्रकाराला गिराम तालेब कबीर या छत्रपती संभाजीनगरच्या विणकराला 40 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले. भंडारा येथील कोसा करवती साडी वाणाच्या प्रकारातील मुरलीधर निनावे या विणकराला 30 हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक मिळाले.

राज्यस्तरीय पारंपारिक कापड स्पर्धेत गिराम तालेब कबीर या विणकराला पैठणीसाठी प्रथम 20 हजार रुपयांचे, दीपक माहुलकर या येवला येथील विणकराला द्वितीय क्रमांकाचे 15 रुपयांचे तर येवलाच्याच युवराज परदेशी याला तृतीय क्रमांकाचे 10 हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. हिमरु शाल प्रकारात छत्रपती संभाजी नगरच्या इमरान कुरेशी यांना 20 हजार रुपयांचे प्रथम, फैसल कुरेशी यांनी 15 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक मिळाले.

करवती प्रकारात अनुक्रमे उध्दव निखारे, गंगाधर गोखले, इशिका पौनीकर यांना प्रथम, द्वितीय व तृतीय असे पुरस्कार मिळाले. घोंगडी प्रकारात अक्कलकोट येथील सिध्दम्मा कलमनी, रेव्वंमा सिन्नुर, विजयालक्ष्मी हुलमनी या तिन्ही महिलांनीच अनुक्रमे प्रथम ते तृतीय पुरस्कार मिळविले. खण फॅब्रीक प्रकारात उमरेड येथील कृष्णाजी धकाते, यशवंत बारापात्रे नागपूर व प्रभाकर निपाने यांनी अनुक्रमे प्रथम ते तृतीय असे पुरस्कार प्राप्त केले. याचबरोबर तुती/टसर लक्षाधीश शेतकऱ्यांना या कार्यक्रमात पुरस्कार बहाल करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT