नागपूर : गच्चीवर खेळत असताना तोल जावून पाण्याच्या टाकीत पडलेल्या एका ४ वर्षीय चिमुकलीचा बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.१५) वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अबूमिया नगर येथे घडली. अनम बानो असे या चिमुकलीचे नाव आहे.
खेळायला गेलेली अनम बानो दोन अडीच तास उलटूनही घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. यादरम्यान पाण्याच्या टाकीत एका कुटुंबातील सदस्याचे पाण्याच्या टाकीत लक्ष्य गेले असता ती टाकीत आढळून आली. नातेवाईकांनी तिला बेशुद्धवस्थेत तातडीने टाकीतून बाहेर काढून तिला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र उपचारपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.