कामठीत गॅस सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू,अनेकजण जखमी file photo
नागपूर

Gas Cylinder Explosion : कामठीत गॅस सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू,अनेकजण जखमी

घरात गॅस सिलेंडर पेटवताना अचानक लागलेल्या आगीत ४० वर्षीय व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Gas Cylinder Explosion in Kamptee: One Dead, Several Injured

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधीनगर भाजीमंडी परिसरात आज रविवारी सकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. घरात गॅस सिलेंडर पेटवताना अचानक लागलेल्या आगीत ४० वर्षीय व्यक्तीचा होरपळून मृत्यू झाला. अतुल दशरथ पानतावणे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

​या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आज सकाळी अतुल पानतावणे यांच्या घरी त्यांची पत्नी घरगुती कामासाठी गॅस पेटवत होती. यावेळी अचानक सिलेंडरने पेट घेतला आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले.

या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने अतुल पानतावणे यांचा जागीच मृत्यू झाला. या आगीच्या घटनेत आसपासचे काही जण जखमी झाले असून नावे मिळू शकली नाहीत. ​घटनेची माहिती मिळताच जुनी कामठी पोलिसांनी घटनास्थळ गाठले.

मृतकाचे भाऊ नितीन दशरथ पानतावणे (वय ५०) यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी कलम १९४ बी.एन.एस.एस. अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सपोनि मनीष हिवरकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT