Gadchiroli Ashram School Snakebite Case
नागपूर: गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील सर्पदंशाची घटना घडली होती. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणाऱ्या इयत्ता पाचवीतील दीपिका मडावी हिला प्रकृतीत सुधारणा झाल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
रुग्णवाहिकेद्वारे केकावाही (ता. धानोरा) येथील गावी पोहोचविण्यात आले. इतर विद्यार्थिनींपैकी कविता किरंगे आणि दीपिका मडावी या दोघींना प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, अशी माहिती आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचार सुरू असलेल्या इयत्ता सहावीतील कविता किरंगे हिला १४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता डिस्चार्ज देण्यात आला. प्रशासनाने तिला मेढरी (ता. एटापल्ली) येथील तिच्या निवासस्थानी सुरक्षितपणे पोहोचवले. दरम्यान, गडचिरोली येथे उपचार सुरू असलेली समृद्धी सुरेश नैताम ही बोलण्याला प्रतिसाद देत असून तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.