Suspension File Photo
नागपूर

Teachers suspended | जेवणासाठी गोंधळ घालणारे मद्यधुंद चार शिक्षक निलंबित

मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी हे निलंबनाचे आदेश दिले

पुढारी वृत्तसेवा

नागपूर: नागपूर जिल्हा परिषदेतील चार मद्यधुंद शिक्षकांवर गैरवर्तनाचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. जि.प.च्या कर्मचारी व अधिकारी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत या शिक्षकांनी जेवणाच्या निमित्ताने गोंधळ घातला होता. अखेर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी हे निलंबनाचे आदेश दिले.

हिंगणा पंचायत समितीअंतर्गत सहाय्यक शिक्षक मनोज मानकर, कामठी पंचायत समितीतील गुमथी येथील साहाय्यक शिक्षक चंद्रशेखर शिंदे, एकर्डी शाळेचे साहाय्यक शिक्षक रमेश चाकुलकर व खसाळा शाळेचे साहाय्यक शिक्षक मनीष पोराटे अशी निलंबित करण्यात आलेल्या चार शिक्षकांची नावे आहेत. याखेरीज अन्य एका शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, जिल्हा परिषदेमध्ये ८,५०० कर्मचारी कार्यरत आहेत. जि. प. अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यंदा १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान या विविध स्पर्धा कृषी महाविद्यालय परिसरात पार पडल्या.यादरम्यान कर्मचाऱ्यांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, मद्यप्राशन करून पाच शिक्षकांनी वाद घातला. महामुनी यांनी ही बाब गांभीर्याने घेतल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT