भांडेवाडी डंम्‍पिंग यार्डला दुसऱ्यांदा लागलेली आग अग्‍निशमनकडून नियंत्रणात File Photo
नागपूर

Bhandewadi Dumping Fire : भांडेवाडी डंम्‍पिंग यार्डला दुसऱ्यांदा लागलेली आग अग्‍निशमनकडून नियंत्रणात

भांडेवाडी डंम्‍पिंग यार्डला याआधी लागलेली आग सलग आठवडाभर धुमसत होती.

पुढारी वृत्तसेवा

Firefighters bring the fire at Bhandewadi dumping yard under control

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

भांडेवाडी डम्पिंग यार्डला दुसऱ्यांदा लागलेली आग सोमवारी रात्री उशिरा नियंत्रणात आली. यापूर्वी लागलेली आग आठवडाभर धुमसत होती. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

आता दोन दिवसांपूर्वी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे भांडेवाडी डंपिंगला आग लागली त्या परिसरात, घटनास्थळी भेट देण्यास जाणार असताना पुन्हा आग लागल्‍याची घटना घडली.

तुलसीनगर परिसर येथे लागलेली ही आग विझविण्यासाठी कळमना व लकडगंज अग्निशमन केंद्राद्वारे संयुक्तिक कार्य करून पूर्णपणे आग विझविण्यात आली. उपरोक्त स्थळावरून फायर टेंडर केंद्रात पुन्हा रवाना झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT