Farmer Life Ended Nagpur
नागपूर : शेतात विष प्राशन करून शेतकऱ्याने जीवन संपविले. ही घटना केळवद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पहिलेपार भागात घडली. खुशाल बळीराम जोगी (वय ५२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी सकाळी खुशाल हे शेतात गेले. तेथे त्यांनी विष प्राशन केले. प्रकृती खालावल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
खुशाल यांनी १४ एकर शेती एक वर्षासाठी बटईने घेतली. शेतात पेरणी केली होती. मात्र पाऊस लांबल्याने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे ते चिंतेत होते. आर्थिक अडचणीमुळे ते तणावात राहायचे. यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचल्याचे सांगण्यात येते. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.