नागपूर : नागपुरात सोमवारी औरंगजेबाच्या कबरीवरून दगडफेक, जाळपोळ, हिंसाचार उसळला होता. यापाठीमागील सूत्रधार, मास्टर माइंड हा एमडीपीचा ( मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी ) शहर अध्यक्ष फईम शमीम खान वय 38 वर्षे हा असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. गणेशपेठ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी आतापर्यंत 46 जणांना अटक करण्यात आली असून अटकेतील 19 आरोपींना 21 मार्च पर्यंत पोलिस कोठडी दिली गेली आहे.
आज बुधवारी देखील पोलिसांनी तीन ते चार लोकांना ताब्यात घेतले आहे. यापुढेही कारवाई सुरू राहणार असा असून सहा गुन्हे दाखल आहेत. त्या सर्व गुन्ह्यांची बारकाईने तपासणी केली जाईल आजच कोणाला मास्टरमाई किंवा आणखी कोणी योग्य नाही सखोल तपासाअंती आम्ही सर्व बाबी उघड करू, या मागे कुठल्या शक्ती आहेत संघटना आहेत त्याचाही तपास सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी दिली. मंगळवारी मध्यरात्री उशिरापर्यंत या आरोपींबाबत न्यायालयीन सुनावणी सुरू होती.
अटकेतील फईम खानने केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूर लोकसभा मतदारसंघातून मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी अर्थात एमडीपीच्या वतीने निवडणूक लढविली होती. साडेसहा लाखावर मतांनी त्याचा दारुण पराभव झाला. सोमवारी विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर दिवसभर महाल गांधी गेट शिवतीर्थ परिसरात आणि शेजारच्या चिटणीस पार्क, भालदारपुरा हंसापुरी येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. यावेळी प्रक्षोभक भाषण करून जमावाला चिथावणी देण्याचे काम या नईम खानने केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. आतापर्यंत या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या 19 आरोपींना न्यायालयाने 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.